दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 2000 रुपये; पीएम किसान योजनेच्या 24 व्या हप्ताबाबत मोठी अपडेट समोर

या योजनेअंतर्गत देशातील सुमारे 9.30 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2,000 रुपयांचा हप्ता जमा केला जाणार आहे.
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 2000 रुपये; पीएम किसान योजनेच्या 24 व्या हप्ताबाबत मोठी अपडेट समोर
PM Kisan 24th installment

देशभरातील कोट्यवधी शेतकरी ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ (पीएम किसान) योजनेच्या आगामी 24 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. विशेषतः रब्बी पिकांची पेरणी, तसेच खते आणि बियाणे खरेदी करण्यासाठी ही आर्थिक मदत शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. मिळालेल्या माहितीनुसार, यंदा दिवाळीपूर्वी आणि दसऱ्यानंतरच्या काळात ही 2,000 रुपयांची रक्कम थेट पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. जरी सरकारकडून यासंदर्भात कोणतीही अंतिम अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नसली, तरी ऑक्टोबर महिन्यातच हा हप्ता रिलीज होण्याची चिन्हे आहेत.

9.30 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार थेट लाभ

या योजनेअंतर्गत देशातील सुमारे 9.30 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2,000 रुपयांचा हप्ता जमा केला जाणार आहे. 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू झालेल्या या महत्त्वकांक्षी योजनेंतर्गत सरकारकडून दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत प्रत्येकी 4 महिन्यांच्या अंतराने तीन समान हप्त्यांत दिली जाते. यापूर्वीचा म्हणजेच 23 वा हप्ता जून 2026 मध्ये वितरित करण्यात आला होता. आता मागील हप्त्याला चार महिने पूर्ण होत असल्याने, दिवाळीच्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून हा निधी वितरीत केला जाण्याची शक्यता बळावली आहे.

हप्ता मिळण्यासाठी ई-केवायसी आणि बँक खात्याची पूर्तता अनिवार्य

शेतकऱ्यांचा हप्ता तांत्रिक कारणांमुळे अडकू नये, यासाठी काही महत्त्वाची कामे पूर्ण करणे बंधनकारक आहे. लाभार्थ्यांनी आपल्या बँक खात्याचे ई-केवायसी (e-KYC) यशस्वीरित्या पूर्ण केले आहे की नाही, हे तपासून घेणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच, आपले बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे आणि ते सक्रिय स्थितीत असावे. जमिनीच्या कागदपत्रांमध्ये कोणतीही तफावत किंवा त्रुटी असल्यास मदत रोखली जाऊ शकते.

हेही वाचा –  ग्राहकांना मोठा दिलासा! महानवमीच्या दिवशी सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर

शेतकरी pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ‘नो युअर स्टेटस’ पर्यायाद्वारे आपल्या अर्जाची स्थिती तपासू शकतात. कोणत्याही फसव्या फोन कॉल किंवा मेसेजमधील लिंक्सवर क्लिक न करता, सुरक्षितपणे अधिकृत पोर्टलमूळे माहिती तपासावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version