PM Narendra Modi : बंगालमध्ये भाजपासाठी विजय असंभव; पंतप्रधान मोदींकडून पश्चिम बंगालच्या मंत्र्यांचं ‘चॅलेंज एक्सेप्टेड’

बिहार विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या भव्य विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट शब्दांत विधान केलं पंतप्रधानांच्या या  वक्तव्यावर पश्चिम बंगालच्या मंत्री शशि पांजा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

PM Narendra Modi : बंगालमध्ये भाजपासाठी विजय असंभव; पंतप्रधान मोदींकडून पश्चिम बंगालच्या मंत्र्यांचं ‘चॅलेंज एक्सेप्टेड’

प्रसाद काथे, प्रतिनिधी 

1. आता लक्ष्य बंगाल : बिहार विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या भव्य विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की आता “बंगालमधील जंगलराजही उखडून फेकू”. पंतप्रधानांच्या या  वक्तव्यावर पश्चिम बंगालच्या मंत्री शशि पांजा यांनी म्हटले की “पंतप्रधान मोदी कोणत्याही भ्रमात राहू नये. बंगालमध्ये भाजपासाठी विजय असंभव आहे”. तृणमूलच्या राज्यसभा खासदार सागरिका घोष म्हणाल्या की “पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगाल जिंकण्याची, बंगालवर कब्जा करण्याची भाषा करत आहेत, जणू बंगाल त्यांच्या बायोडाटामध्ये जोडण्यासाठी आणखी एक जमीनीचा तुकडा आहे”. प्रवक्ता कुणाल घोष यांनीही “बंगालची वाघीण त्यांची वाट पाहत आहे”, असे दर्पोक्तीपूर्ण विधान केले आहे.

2.    पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची आजपर्यंतची राजकीय कारकीर्द पाहिल्यास त्यांना अशा आव्हानांची केवळ सवयच नाही, तर ते प्रत्येक आव्हान त्यांनी अतिशय यशस्वीपणे पार केले आहे. आव्हाने पार करण्यात ते शब्दाला जागणारे नेेते आहेत, हे सारा भारत जाणतो. त्यामुळे यंदा नक्कीच बंगाल भगवाधारी होणार आणि पंतप्रधान मोदी तेथे नक्कीच गंगास्नान करणार, यात कोणतीही शंका नाही. 

3.    बिहार विधानसभा निवडणूक २०२५ : निवडणुकांपूर्वी तेजस्वी यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधून म्हटले होते की “बिहारला बाहेरील शक्ती नियंत्रित करू देणार नाहीत, बिहार बिहारीच चालवेल, बाहेरील कोणी नाही”. राहुल गांधी पंतप्रधान मोदींना ‘घाबरट’ असे संबोधून खालच्या पातळीवरील टिका केली होती. मात्र, पंतप्रधान मोदींनी हे आव्हान स्वीकारून निवडणूक प्रचारात सांगितले की “नीतीश कुमार यांच्या नेतृत्वात एनडीए बिहारमधील सर्व जुने विक्रम तोडण्यासाठी तयार आहे”. आणि झालेही तसेच – एनडीएने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत इतिहास रचला आणि “बिहारला कट्टाराजपासून मुक्ती देऊ” हा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरा करून दाखवला. 

4.    दिल्ली विधानसभा निवडणूक २०२५ : आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी मार्च 2023 मध्ये विधानसभेत विधान केले होते की “पंतप्रधान नरेंद्र मोदी या जन्मात दिल्ली जिंकू शकत नाहीत”. निवडणुकांच्या दरम्यानही केजरीवाल पंतप्रधान मोदींना आव्हान देत म्हणत होते की “मोदीजी, तुम्ही आम्हाला या जन्मात हरवू शकत नाही, आम्हाला हरवण्यासाठी तुम्हाला आणखी एक जन्म घ्यावा लागेल”.

5.    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेव्हाही “दिल्लीमध्ये पुढचे सरकार भाजपाचे बनेल” असा आत्मविश्वास व्यक्त केला होता. त्यामुळे यंदा दिल्लीच्या जनतेनेच केजरीवाल यांचे आव्हान स्वीकारले आणि आपला दिल्लीमधून उखडून पंतप्रधान मोदींच्या आव्हानास सकारात्मक प्रतिसाद दिला. 

6.    वक्फ बोर्ड : काँग्रेसने राजकीय तुष्टीकरण आणि वोटबँकेसाठी वक्फला देशातील संपत्ती आंदण दिल्याचे आतापर्यंत चित्र होते. पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट सांगितले होते की संविधानात वक्फ कायद्याला कोणतेही स्थान नाही. त्यामुळे मोदी सरकारने वक्फ सुधारणा विधेयक, 2025 आणले.

7.    काँग्रेस, आप आणि इतर विरोधी पक्षांनी वक्फ संशोधन विधेयकाला अल्पसंख्याकांच्या अधिकारांवर हल्ला म्हटले. काँग्रेस सांसद खलीकुर रहमान म्हणाले की सरकार वक्फ बोर्डची स्वायत्तता संपवत आहे. काँग्रेस नेते किरण कुमार चमाला म्हणाले की जर हे विधेयक कोणत्याही समुदायाच्या अस्तित्वाला धोका देत असेल, तर त्याचा विरोध आवश्यक आहे. विरोधकांचा आरोप होता की हे विधेयक मुस्लिम समाजाला लक्ष्य करण्यासाठी आहे. कोणत्याही दबावाला न झुकणाऱ्या मोदी सरकारने वक्फ (संशोधन) कायदा 2025 अधिकृतपणे लागू केला आहे. संसदेतून दोन्ही सभागृहांतून पास होऊन आणि राष्ट्रपतींची मान्यता मिळाल्यानंतर हा कायदा प्रभावी झाला. यासह देशातील वक्फशी संबंधित कायद्यात महत्त्वपूर्ण बदल झाले. 

8.    सर्जिकल, एअर स्ट्राईक, ऑपरेशन सिंदूर : पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांनी घुसखोरी करून कश्मीरमध्ये आणि भारतात अनेक ठिकाणी हल्ले करणे आणि त्यानंतर भारताने केवळ मौखिक निषेध नोंदवणे, असे चित्र काँग्रेसच्या काळात होते. परंतु पंतप्रधान मोदी यांनी हे चित्र बदलले आणि दहशतवाद्यांना वेचून ठार मारण्याचे धोरण स्वीकारले. पंतप्रधान मोदींनी सैन्याला खुली सूट देऊन दहशतवाद्यांचा हिमोड करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक आणि ऑपरेशन सिंदूरद्वारे भारतीय सैन्याने दाखवून दिले की वेळ आली तर भारतीय सेना काहीही करण्यास समर्थ आहे. 

9.    ट्रिपल तलाक : जेव्हा मोदी सरकारने मुस्लिम महिलांना तीन तलाकच्या अत्याचारातून मुक्त करण्याचे ठरवले, तेव्हा काँग्रेससह संपूर्ण विरोधी पक्षांनी त्यास विरोध केला होता. सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी वोटबँक राजकारण करत सांगितले होते की या कायद्याचा वापर अल्पसंख्याकांच्या विरोधात शस्त्र म्हणून केला जाईल. मात्र, मोदी सरकारच्या इच्छाशक्तीमुळे सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करून कुप्रथेस बंदी घालण्याचे निर्देश दिले आणि मोदी सरकारने तसा कायदा केला.

10.    आता तीन तलाक कायद्यानुसार एखादा मुस्लिम पुरुष जर मौखिक, लिखित किंवा कोणत्याही माध्यमातून आपल्या पत्नीला एकावेळी तीन तलाक देतो, तर ते अपराध मानले जाते. तीन तलाकच्या भीतीत जगणाऱ्या मुस्लिम महिलांना आता आत्मसन्मानाने जगण्याचे जीवन मिळाले आहे. कोणालाही न घाबरता पंतप्रधान मोदी यांनी जे म्हटले ते करून दाखवले.

11.    कलम 370 : जम्मू–कश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या संविधानातील कलम 370 ला हटवणे हे सर्वात मोठे आव्हान होते. विरोधक म्हणत होते, पंतप्रधान मोदी यांनी असे करण्याची हिंमत केली तर देशात आग लागेल. मे 2014 मध्ये जम्मू–कश्मीर लिबरेशन फ्रंटचा नेता यासीन मलिक म्हणाला होता की भारतीय जनता पार्टी राम मंदिर, समान नागरिक संहिता आणि कश्मीरचे एकीकरण— ही तीनही मुद्दे पूर्ण करू इच्छित असेल तर संपूर्ण दक्षिण आशियात मोठी आग लागू शकते, जी कोणीही विझवू शकणार नाही.

12.    माजी केंद्रीय मंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला म्हणाले होते की “मोदी दहा वेळा पंतप्रधान झाले तरी ते कलम 370 हटवू शकत नाहीत”. मात्र, असे कोणतेही आव्हान नाही, जे पंतप्रधान मोदी पार करू शकत नाहीत; याचा प्रत्यय देशास पुन्हा एकदा आला.

13.    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू आणि कश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या संविधानातील कलम 370 ला रद्द केले. हे कश्मीरचे भारताशी पूर्ण एकीकरणाचे प्रतीक होते, ज्यामुळे भाजपचा "एक राष्ट्र, एक संविधान" हा विचार मजबूत झाला. यासीन मलिकसारखे फुटीरतावादी यामुळे कायद्याच्या वरवंट्याखाली आहे. सर्वप्रकारचा विरोध आणि आव्हाने भेदून पंतप्रधान मोदी अढळ राहिले आणि कलम 370 इतिहासजमा झाले.

14.    भव्य श्रीराम मंदिर :  अयोध्येतील श्रीराम मंदिरावरून घेऊन काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष मोदी सरकारला डिवचत असत. "मंदिर वहीं बनाएंगे मगर तारीख नहीं बताएंगे", हा विरोधकांचा आवडता टोमणा होता. पंतप्रधान मोदी यांनी त्यांना चोख प्रत्युत्तर देऊन रामभक्तांची पाचशे वर्षांची तपस्या आणि दीर्घ न्यायिक प्रक्रियेनंतर जनसहभागातून श्रीराम मंदिराची उभाऱणी करून विरोधकांची तोंडे कायमची बंद केली आहेत.

15.    आज प्रत्येक नागरिक हेच म्हणतो की भव्य श्रीराम मंदिराची उभारणी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच साध्य करणे शक्य होते. अयोध्येत श्रीराम मंदिर उभारणीचे वचन पूर्ण करून मोदी सरकारने हिंदू गौरव आणि सांस्कृतिक पुनर्जागरणाचा मैलाचा दगड गाठला आहे. 

16.    नरेंद्र मोदी यांनी जेव्हा पंतप्रधानपदाची शपथ घेतली तेव्हा त्यांच्या समोर अनेक आव्हाने होती. देशात विकास आणि सुधारणांचा डोंगर होता. त्याचवेळी असेही काही मुद्दे होते, ज्यांना ‘वादग्रस्त’ ठरवून त्यांना पूर्ण करणे असंभव मानले जात होते. विरोधकांचे नेते मोदी सरकारवर त्या मुद्द्यांना घेऊन तोंडसुख घेत आणि आव्हान देत की “हिंमत असेल तर हे करून दाखवा”. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकारने त्या प्रत्येक आव्हानाला केवळ पूर्णच केले नाही, तर अशक्य ते शक्यही करून दाखवले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number