मॅट्रिमोनियल साइटवरून ओळख, पुढे तरुणीसोबत घडला धक्कादायक प्रकार; फूड डिलिव्हरी ॲपने आरोपींचा खेळ संपवला

Marriage Promise Scam : मॅट्रिमोनियल साईटच्या माध्यमातून तरुणींशी संपर्क साधून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. फूड डिलिव्हरी अॅपच्या माध्यमातून आरोपींचा माग काढण्यात आला. या कारवाईमुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

मॅट्रिमोनियल साइटवरून ओळख, पुढे तरुणीसोबत घडला धक्कादायक प्रकार; फूड डिलिव्हरी ॲपने आरोपींचा खेळ संपवला
Matrimonial Site Fraud Exposed

लग्न जुळवणाऱ्या वेबसाईटवरुन सुरु झालेल्या ओळखीचा शेवट हा अत्यंत धक्कादायक प्रकरणात झाल्याचा प्रकार हा वाशीमध्ये उघडकीस आलेला आहे. या प्रकरणी वाशी पोलिसांनी दोन तरुणांना अटक केलेली आहे. मुख्य आरोपी नागेश पवरा हा मॅट्रिमोनियल साीटवर बनावट प्रोफाइल तयार करत असंख्य तरुणींशी संपर्क साधायचा. तरुणींना लग्नाचे आमिष दाखवत त्यांच्याकडूनच वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे उकळत असायचा.

तक्रारी वाढल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. महत्त्वाचे एक गोष्ट पोलिसांच्या हाती लागली, ती म्हणजे आरोपी फूड डिलिव्हरी अॅपवरुन नियमित जेवण मागवत असल्याचे समजले. याच माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याचा माग काढला. अखेर मीरा-भाईंदर येथील एका हॉटेलमध्ये पोलिसांनी डिलिव्हरी बॉयच्या वेशात जाऊन सापळा रचला. अखेर यावेळी नागेश पवार आणि त्याचा साथीदार आकाश वर्मा या दोघांना अटक करण्यात आलेली आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number