पुणे : पुणे पदवीधर तसेच शिक्षक विधानपरिषद मतदारसंघाच्या 2026 अर्थात या वर्षीच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचालींनी वेग आलेला आहे. अर्ज वाटप प्रक्रियेत इच्छुकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत असून, फक्त 3 दिवसांत तब्बल 145 व्यक्तींनी 259 अर्ज घेतले आहे.
पुणे विधानपरिषद निवडणुकीचा बिगुल
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 29 सप्टेंबर रोजी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. पहिल्याच दिवशी पदवीधर मतदारसंघासाठी 36 व्यक्तींनी 61 अर्ज घेतले, तर शिक्षक मतदारसंघासाठी 19 व्यक्तींनी 36 अर्ज वाटप घेतले, तर दुसऱ्या दिवशी अर्थात 30 सप्टेंबर पदवीधर मतदारसंघासाठी 22 व्यक्तींनी 35 अर्ज घेतले असून शिक्षक मतदारसंघासाठी 24 व्यक्तींनी 42 इतके अर्ज घेतले.
खरं तर आज ऑक्टोबर महिन्याच्या महिल्याच दिवशी अर्ज घेणाऱ्यांच्या संख्येत ही आणखी वाढ झाली आहे. आज पाहिलं तर एकाच दिवशी पदवीधर मतदारसंघात 28 व्यक्तींनी 59 अर्ज घेतले, तर शिक्षक मतदारसंघात 16 व्यक्तींनी 31 अर्ज वाटत घेतले. साधारण आकडवारी पाहिली तर 1 ऑक्टोबर अखेर पदवीधर मतदारसंधासाठी एकून 86 व्यक्तींनी 150 इतके अर्ज घेतले आहेत . तर शिक्षक मतदारसंघासाठी 59 व्यक्तींनी 109 अर्ज घेतले आहे.
दोन्ही मिळून 145 इच्छुकांनी 259 अर्ज वाटप घेतल्याने या निवडणुकीची चुरस आणखी वाढणार आहे. आगामी काही दिवसांत अर्ज घेणाऱ्या इच्छुकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.