पुण्यातील सातारा रस्त्यावरील वाहतुकीत मोठे बदल; मेट्रोच्या कामामुळे दुगड चौकात सिग्नलमुक्त व्यवस्था, अवजड वाहनांना बंदी

. सातारा रस्त्यावरील बीआरटी (BRT) ट्रॅक पूर्णपणे काढून टाकण्यात आला असून, दुगड चौक आता सिग्नलमुक्त करण्यात आला आहे.

पुण्यातील सातारा रस्त्यावरील वाहतुकीत मोठे बदल; मेट्रोच्या कामामुळे दुगड चौकात सिग्नलमुक्त व्यवस्था, अवजड वाहनांना बंदी
Pune traffic news

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. पुणे शहरातील सातारा रस्त्यावर भूमिगत मेट्रो आणि नवीन मेट्रो स्थानकाच्या कामाला गती देण्यासाठी वाहतूक शाखेने मार्गात मोठे फेरबदल केले आहेत. सातारा रस्त्यावरील बीआरटी (BRT) ट्रॅक पूर्णपणे काढून टाकण्यात आला असून, दुगड चौक आता सिग्नलमुक्त करण्यात आला आहे. या नव्या व्यवस्थेमुळे बिबवेवाडी, अरण्येश्वर तसेच आसपासच्या भागातून येणाऱ्या वाहनचालकांना इच्छित स्थळी जाण्यासाठी आता यु-टर्न घेऊनच पुढे जावे लागत आहे. स्वारगेटकडून कात्रजच्या दिशेने जाताना सिटीप्राइड थिएटर ओलांडल्यानंतर येणाऱ्या या चौकातून पूर्वी थेट वळता येत होते; मात्र आता सिग्नल रद्द केल्यामुळे प्रवाशांना पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागत आहे.

स्वारगेटकडे जाण्यासाठी शाहू कॉलनी चौकातून फेरा

नवीन वाहतूक नियमांनुसार, बिबवेवाडी बाजूकडून येऊन स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांना दुगड चौकातून आधी पद्मावतीच्या दिशेने पुढे जावे लागते. त्यानंतर शाहू कॉलनी चौकातून सुमारे 200 मीटरचा वळसा घालून यु-टर्न घेत स्वारगेटचा मार्ग पकडावा लागत आहे. रविवारी सकाळपासून अचानक लागू करण्यात आलेल्या या बदलांमुळे अनेक वाहनचालकांचा मोठा गोंधळ उडाला. अतिरिक्त अंतर टाळण्यासाठी काही नागरिक विरुद्ध दिशेने गाड्या चालवण्याचा किंवा दुभाजकावरून वाहने नेण्याचा प्रयत्न करताना दिसले, ज्यामुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली होती.

हेही वाचा –  गिरणी कामगारांच्या घरांसाठी राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय; जमिनीसंदर्भातील ‘ही’ अट शिथिल, पुनर्वसनाला मिळणार वेग

कात्रज परिसरात जड वाहनांना प्रवेशबंदी

दरम्यान, कात्रज चौकातील मेट्रो स्थानकाच्या कामामुळे शहरात येणाऱ्या अवजड आणि जड वाहनांवर कडक प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. जुन्या व नव्या कात्रज बोगद्यासह नवले पूल, मंतरवाडी चौक, खडीमशीन चौक आणि इस्कॉन मंदिर चौकापुढील भागात जड वाहनांना मनाई करण्यात आली आहे. केवळ मंतरवाडी, उंड्री आणि पिसोळी भागातील स्थानिक जड वाहनांना रात्री 10 ते पहाटे 4 या वेळेतच मर्यादित प्रवेश दिला जाईल. याशिवाय, एसटी बस आणि खाजगी ट्रॅव्हल्सना नवले पुलावरून कात्रजकडे येण्यास बंदी घालण्यात आली असून, साताऱ्याकडून येणाऱ्या बसेसना नवले पुलाखालून उजवीकडे वळून स्वारगेटकडे जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number