मुंबई-गोवा महामार्गावर काळाचा घाला! भरधाव कार शेतात घुसली अन् अनर्थ घडला; एक ठार, दोन गंभीर जखमी

Raigad Accident : मुंबई-गोवा या महामार्गावर एक भीषण अपघात झाल्याची घटना समोर आलेली आहे. महाड तालुक्यातील केंबुर्ली गावच्या हद्दीत अनियंत्रित झालेली एक कार थेट शेतात जाऊन आदळली.

मुंबई-गोवा महामार्गावर काळाचा घाला! भरधाव कार शेतात घुसली अन् अनर्थ घडला; एक ठार, दोन गंभीर जखमी
Mumbai-Goa Highway Accident

रायगड : मुंबई-गोवा या महामार्गावर एक भीषण अपघात झाल्याची घटना समोर आलेली आहे. महाड तालुक्यातील केंबुर्ली गावच्या हद्दीत अनियंत्रित झालेली एक कार थेट शेतात जाऊन आदळली. ज्यात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण गंभीर जखमी झालेले आहेत.

कोकणातून मुंबईकडे येताना काळाचा घाला
मिळालेल्या माहितीनुसार, ही कार कोकणातून मुंबईच्या दिशेने येत होती. दरम्यान, केंबुर्ली या गावाजवळ आल्यानंतर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार भरधाव वेगात रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतात जाऊन जोरदार आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की कारचे मोठे नुकसानही झाले आहे. या भीषण अपघातात कारमधील एक प्रवासी जागीच ठार झाला आहे. तर याच दरम्यान रस्त्यावर काम करत असणारे दोन कामगार या कारच्या धडकेत गंभीर जखमी झालेले आहेत.

हेही वाचा-रोजची मारहाण, अयोग्य नजर; अल्पवयीन मुलीने वडिलांसोबतचं…; नागपूर हादरलं!

एकाची प्रकृती चिंताजनक
अपघाताचा आवाज ऐकताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने मदतकार्य सुरु केले. या घटनेची माहिती मिळताच महाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने महाड येथील रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहे. तर एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.

खरं तर मुंबई-गोवा या महामार्गावर वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. वेगावर नियंत्रण नसल्याने असे भीषण अपघात घडत असल्याचे बोलले जात आहे. या अपघातामुळे काही वेळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी सध्या या घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरु आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number