दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर काळाचा घाला; सहलीसाठी आलेल्या 8 जणांचा बुडून अंत

Raigad Diveagar Beach Tragedy : रायगडच्या दिवेआगर समुद्र किनाऱ्यावर अतिशय मोठी दुर्घटना घडली आहे. फिरण्यासाठी आलेले आठ जण समुद्रात बुडाले. पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर काळाचा घाला; सहलीसाठी आलेल्या 8 जणांचा बुडून अंत
पाण्याचा अंदाज न आल्याने आठही जण बुडाले

रायगड : रायगड जिल्ह्यातील प्रसिद्द असलेल्या दिवेआगर या समुद्र किनाऱ्यावर आज एक अतिशय हृदयद्रावक दुर्घटना घडली आहे. पुण्यातील आळंदी येथूल खाजगी क्लासच्या सहलीसाठी आलेले तब्बस 8 जण समुद्रात बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे.

समुद्रात काळाचा घाला
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील आळंदी येथील एका खाजगी क्लासेस दिवेआगर येथे सहलीसाठी आला होता. विद्यार्थी समुद्रकिनाऱ्यावर फिरत असताना काही जण पाण्यात उतरले. मात्र, समुद्राच्या खोलीचा आणि पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने आठही जण बुडू लागले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि महाकाली वॉटर स्पोर्ट्सच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने बचाव कार्य सुरु केले.

हेही वाचा-हिमाचलमध्ये भयंकर कांड करून मुंबईच्या दिशेने निघाले; वाटेत भूक लागताच एक चूक केली अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकले

स्थानिकांच्या मदतीने शोध मोहीम ही राबवण्यात आली. अखेर सर्व आठही जणांचे मृतदेह हे पाण्याबाहेर काढण्याच बचाव पथकाला यश आले. विद्यार्थ्यांचे सर्व मृतदेह हे बोर्ली पंचतन प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. या घटनेमुळे आळंदी आणि दिवेआगर या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.

रायगडमधील दिवे आगर येथे घडलेल्या घटनेमध्ये आळंदी पुणे येथील विनर्स अकॅडमी फॉर 11वी आणि 12वी या अकॅडमीचे 25 मुले, 17 मुली आणि 06 शिक्षक असे एकूण 48 विद्यार्थी तसेच शिक्षक हे दिघी सागरी , दिवेआगर येथील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी आले होते. त्यातील 08 विद्यार्थी समुद्रकिनाऱ्यावर पोहत असताना बुडाले आहेत. यामधील 08 विद्यार्थी मयत झालेले आहेत. दिघी पोलिसांकडून पुढील कार्यवाही चालू आहे.

मयत मुलांची नावे खालीलप्रमाणे

1) तन्मय दत्तात्रय वहीले
2) सुमित भरत अहिरे
3) प्रणव रामदास बनसोडे
4) कैवल्य सतीश वासनकर
5) राजवीर युवराज वहीले
6) यश किरण वानखेडे
7) सोहम तुकाराम भांडवलकर
8) कौस्तुभ संदीप दौंड
सर्वजण हे 16 वर्षीय वयोगटातील असून आळंदी येथील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version