नारायणपूर : छत्तीसगडमधील नारायणपूर - बिजापूर सीमेजवळ सुरक्षा पथक आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत सात नक्षलवादी ठार झाले. छत्तीसगडमध्ये यंदाच्या वर्षी ११२ नक्षलवादी ठार झाले. जेमतेम पाच महिन्यांत सुरक्षा पथकाला मिळालेल्या यशामुळे नक्षलवाद्यांच्या कारवायांना जबर दणका बसला आहे.