Ganesh Visarjan : हृदयद्रावक! गणपती विसर्जन करून मंडपात झोपले अन् काळाने गाठलं, 4 जणांचा मृत्यू, 2 जखमी; घडलं काय?

एक अतिशय हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. गणेश विसर्जनानंतर तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

Ganesh Visarjan : हृदयद्रावक! गणपती विसर्जन करून मंडपात झोपले अन् काळाने गाठलं, 4 जणांचा मृत्यू, 2 जखमी; घडलं काय?
गणेश मंडप बनला मृत्यूचा सापळा

मध्य प्रदेशातील मंडला जिल्ह्यातून एक अतिशय हृदयद्रावर आणि धक्कादायक घटना समोर आलेली आहे. नैनपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या हिरापूर या गावात विजेचा धक्का लागून तीन जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे.या घटनेमुळे संपूर्ण गावावर गणेशोत्सवाच्या दिवसात शोककळा पसरली आहे.

गणेश मंडप बनला मृत्यूचा सापळा
मिळालेल्या माहितीनुसार, गावात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलेला होता.साधारण शुक्रवारी रात्री गणेश विसर्जनाचा कार्यक्रम पार पडला. बाप्पाचे विसर्जन करुन परत आल्यानंतर थकल्याने काही तरुण आणि ग्रामस्थ मंडपातच झोपले होते. शनिवारी साधारण पहाटेच्या दरम्यान मंडळामध्ये अचानक विजेचा प्रवास पसरला.

हेही वाचा-Parbhani Ganesh Visarjan Accident : परभणीत गणेश विसर्जनाला गालबोट; गोदावरी नदीत गणेश विसर्जनासाठी गेलेले दोन तरुण बुडाले

मंडळामध्ये लावण्यात आलेल्या काही विद्युत लाईट्सच्या वायरमध्ये शॉर्ट सर्किट झाला असावा आणि करंट पसरला असावा. झोपेत असलेल्या लोकांना याची जराही कल्पना आली नाही आणि ते विद्युत प्रवाहाच्या विळख्यात सापडले. याच दुर्घटनेती ती जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे.

पोलिसांनी या घटनेची नोंद करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. या प्रकरणी पोलीसांनी तपास सुरु केला आहे. दरम्यान,प्रशासनाने प्रत्येक गणेश मंडळांना विद्युत सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे, तरीही अशा अनेक घटना घडत आहेत. या घटनेमुळे गणेशोत्सवाच्या आनंदावर विरजण पडले असून संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. विद्युत विभागाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडला का, याचाही तपास केला जात आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number