नात्याला काळीमा! झोपलेल्या आजीवर नातवाची हैवानियत; वेदनेने किंचाळत असताना ही 22 वेळा…; मामे भावामुळे सत्य समोर

Bihar Crime News : बिहारमधून अतिशय संतापजनक आणि तितकीच धक्कादायक घटना समोर आलेली आहे. जिथं नातवाने आजीसोबत नेमके काय केले, त्याबाबत सविस्तर जाणून घ्या.

नात्याला काळीमा! झोपलेल्या आजीवर नातवाची हैवानियत; वेदनेने किंचाळत असताना ही 22 वेळा…; मामे भावामुळे सत्य समोर
shocking incident bihar

प्रत्येक घरात आजी आणी नातवंडांचं नातं हे अतिशय खास असतं. आजी आपल्या नातवंडांवर जीवापाड प्रेम करते. मात्र, सध्या समोर आलेल्या एका हृदयद्रावक घटनेने अनेकांच्या डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहणार नाहीत.

सध्या समोर आलेली संपूर्ण धक्कादायक घटना ही बिहारच्या गोपालगंज येथील बनरहां गावातील आहे. जिथं हत्या झालेल्या महिलेचे नाव खातून वय 85 असे असून आरोपी वय 21 साहेब हुसैन अशी समोर आलेली आहे. या प्रकरणात आरोपी साहेप हसैनला पोलिसांनी अटक केली आहे.

नक्की घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेदिवशी आरोपी हा आजीसोबत जेवला. मात्र तो पर्यंतही कोणाला कल्पना नव्हती असं काही घडेल. जेवणानंतर साहेब हुसैन हा आपल्या आजीसोबत एका खोलीत झोपला होता. साधारण रात्री 2 वाजण्याच्या दरम्यान तो उठला आणि त्याने अचानक आपल्या आजीवर सपासप तब्बल 24 वेळा वार केले. या प्राणघातक हल्ल्यात आजी खातून यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. अशा स्थितीत घरात आरोपीच्या मामे भावाने संपूर्ण प्रकार पाहिला आणि तो प्रचंड घाबरुन गेला. त्याने क्षणात आरडाओरड करुन गावातील लोकांना सर्व घडलेला प्रकार सांगितला.

ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपीला अटक केली. पोलिसांनी वृद्ध महिलेचा मृतदेह ताब्याच घेतला असून हल्ल्यात वापरलेले धारदार शस्त्रासह इतर काही वस्तू ताब्यात घेतल्या आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून अखेर तरुणाने आपल्या आजीची हत्या का केली, असा प्रश्न गावकऱ्यांना पडलेला आहे.

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number