Mankhurd Chawl Collapse : धक्कादायक! मानखुर्दमधील तीन मजली चाळ कोसळून 6 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये 5 मुलांचा समावेश

मुंबई : मुंबईच्या मानखुर्द भागात रविवारी, 5 जुलै 2026 रोजी रात्री मुसळधार पावसात तीन मजली चाळ कोसळून सहा जणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. मुसळधार पावसामुळे ही चाळ कोसळ्याचे समजते. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये पाच मुलांचा समावेश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मृत्यू झालेल्या पाच जणांची ओळख आलिया (7), मुस्कान (14), निहाल (6), नबिया (2) आणि सोनी (32) अशी पटली असून, […]

Mankhurd Chawl Collapse : धक्कादायक! मानखुर्दमधील तीन मजली चाळ कोसळून 6 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये 5 मुलांचा समावेश

मुंबई : मुंबईच्या मानखुर्द भागात रविवारी, 5 जुलै 2026 रोजी रात्री मुसळधार पावसात तीन मजली चाळ कोसळून सहा जणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. मुसळधार पावसामुळे ही चाळ कोसळ्याचे समजते. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये पाच मुलांचा समावेश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मृत्यू झालेल्या पाच जणांची ओळख आलिया (7), मुस्कान (14), निहाल (6), नबिया (2) आणि सोनी (32) अशी पटली असून, शताब्दी रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले. तर मुनाफ या सात वर्षांच्या मुलाला राजावाडी रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. तसेच रेहान अली (24) या जखमी व्यक्तीवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा : Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचा धोका वाढला! मुंबई, रायगड आणि पालघरमध्ये शाळा-कॉलेजांना सुट्टी जाहीर

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार माहितीनुसार, रविवारी रात्री 8.30 वाजता जनता नगर चाळीतील तीन मजली चाळीचा भाग असलेली दोन ते तीन घरे कोसळली. घटनेची माहिती मिळताच तेथे मुंबई अग्निशमन दल, पोलीस, महापालिकेचे वॉर्ड कर्मचारी आणि रुग्णवाहिकांची पथके त्वरीत दाखल झाले. जखमींची सुटका करून त्यांना राजावाडी रुग्णालय आणि शताब्दी रुग्णालयात हलवण्यात आले.
शताब्दी रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, तिथे आणलेल्या पाच जणांना मृत घोषित करण्यात आले. 

दरम्यान, राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी रात्रीच घटनास्थळी भेट दिली. त्यांनी माहिती देताना सांगितले की, “मुंबई आणि उपनगरांमध्ये कालपासून आणि आज सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ही इमारत कोसळली आहे. या इमारतीत सहा जण होते. चार मुले आणि दोन प्रौढ आणि त्या सहाही जणांचा मृत्यू झाला आहे. महानगरपालिका, पोलीस आणि एनडीआरएफची (NDRF) पथके सध्या घटनास्थळी कार्यरत आहेत. या सहा जणांव्यतिरिक्त इतर कोणीही यात अडकलेले असावे, असे मला वाटत नाही. हा झोपडपट्टीचा भाग आहे. जिथे काही बांधकामे करण्यात आली आहेत. मात्र, मुसळधार पावसामुळे ती संपूर्ण इमारत कोसळली. ही इमारत कशी बांधली गेली, ती अशा प्रकारे का बांधली गेली आणि त्यासाठी आवश्यक परवानग्या घेतल्या होत्या का, याची सखोल चौकशी केली जाईल. तसेच, मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.”

तर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू आझमी यांनीदेखील घटनेची दखल घेत, सांगितले की, “मी सरकारला विचारतो. झोपड्या कशा काय उभ्या राहत गेल्या? 2000 साल उजाडले आणि तोपर्यंत बांधलेल्या झोपड्या अधिकृत करण्यात आल्या. त्यानंतर 2011 पर्यंतच्या झोपड्याही अधिकृत केल्या गेल्या. याचा अर्थ असा की, 1995 नंतरही अनधिकृत झोपड्या उभ्या राहत होत्या. हे गरीब लोक आहेत. जेव्हा त्यांना वाटते की त्यांचे कुटुंब वाढले आहे आणि योग्य घरासाठी त्यांच्याकडे पुरेसा पैसा नाही, तेव्हा ते अनधिकृतपणे घरे बांधतात. मात्र, सरकारने जर कठोर भूमिका घेतली असती, तर अनधिकृत बांधकामाचा एक इंचही भाग उभा राहू शकला नसता. सरकारने स्वतःच जाहीर केले होते की 1995 नंतर झोपड्या बांधल्या जाणार नाहीत. मग, त्या बांधल्या गेल्या ही जबाबदारी कोणाची? तुम्ही किती अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे?. मी सभागृहाला विनंती करतो की या अनधिकृत गोष्टींना आळा घालावा.”

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number