Salman Khan Post: ‘सोनम बस झालं, आता घरी परत जा…’; NEET च्या विद्यार्थ्यांसाठी सलमान खानची भावूक पोस्ट

बॉलिवूड अभिनेता सलमान खानने सोशल मीडियाद्वारे विद्यार्थ्यांना आंदोलन मागे घेऊन घरी परतण्याचे आवाहन केले आहे.

Salman Khan Post: ‘सोनम बस झालं, आता घरी परत जा…’; NEET च्या विद्यार्थ्यांसाठी सलमान खानची भावूक पोस्ट

Salman Khan Post: नीट परीक्षा गैरव्यवहाराच्या विरोधात दिल्लीतील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र झाले असून घटनास्थळी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या तणावपूर्ण वातावरणात बॉलिवूड अभिनेता सलमान खानने सोशल मीडियाद्वारे विद्यार्थ्यांना आंदोलन मागे घेऊन घरी परतण्याचे आवाहन केले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत त्याने 24 तासांच्या आत ही दुसरी पोस्ट शेअर केली आहे.

‘पंतप्रधानांवर विश्वास ठेवा’; घरून जेवण पाठवण्याचीही तयारी
सलमान खानने आपल्या ‘X’ पोस्टमध्ये नमूद केले की, शिक्षण आणि सुरक्षा या दोन्ही बाबतीत विद्यार्थी हेच देशाचे प्राधान्य आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रकरणातील सर्व दोषींवर कडक कारवाई करतील, असा विश्वास त्याने व्यक्त केला. आंदोलक विद्यार्थिनीला उद्देशून तो म्हणाला, “सोनम, बस झालं. हे प्रकरण आता पुढे ताणू नकोस. हवं असल्यास मी घरून जेवण पाठवू शकतो, पण तुम्ही सर्वांनी आधी स्वतःची काळजी घेऊन पालकांकडे जावे.”

हेही वाचा – Salman Khan : सलमान खान यांची जंतरमंतरवरील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ पोस्ट; म्हणाले, ‘आंदोलनाला हिंसक वळण लागणं…’

आंदोलनाचे राजकारण करू नका; शांतता राखण्याचे आवाहन
आंदोलनाला राजकीय स्वरूप देण्याला विरोध दर्शवत सलमानने स्पष्ट केले की, या संपूर्ण लढ्याचे श्रेय केवळ विद्यार्थ्यांनाच मिळाले पाहिजे. आदल्या दिवशी शांततापूर्ण आंदोलनाचे कौतुक करतानाच हिंसक वळणावर त्याने खंत व्यक्त केली होती. दुखापतग्रस्त विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांबद्दल सहानुभूती दाखवत त्याने सरकार शिक्षण व्यवस्था अधिक बळकट करेल आणि विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेईल, अशी आशा व्यक्त केली.

‘कॉकरोच जनता पार्टी’कडून उद्या देशभर निदर्शनांची घोषणा
एकीकडे सलमान खानने शांततेचे आणि घरी परतण्याचे आवाहन केले असतानाच, दुसरीकडे ‘कॉकरोच जनता पार्टी’ने या मुद्द्यावर उद्या देशातील सर्व राज्यांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये तीव्र निदर्शने करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे या आंदोलनाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number