Wednesday, January 15, 2025 05:45:07 PM

Modi Oath
मोदींच्या शपथविधीला येणारे परदेशी पाहुणे

नरेंद्र मोदी रविवार ९ जून २०२४ रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. याप्रसंगी शेजारी देशांच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

मोदींच्या शपथविधीला येणारे परदेशी पाहुणे

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी रविवार ९ जून २०२४ रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. याप्रसंगी शेजारी देशांच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. आमंत्रित केलेल्या परदेशी पाहुण्यांनी शपथविधी येत असल्याचे कळवले आहे. याआधी २०१४ मध्ये मोदींच्या शपथविधीला सार्क देशांचे प्रतिनिधी आणि २०१९ च्या शपथविधीला बिमस्टेक देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

मोदींच्या शपथविधीला येणारे परदेशी पाहुणे

बांगलादेश - पंतप्रधान शेख हसीना
नेपाळ - पंतप्रधान पुष्प कमल दहल 
श्रीलंका -  राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे
मालदीव - अध्यक्ष मोहम्मद मुइझू
भूतान - राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक
सेशेल्स - उपाध्यक्ष अहमद अफिफ 
मॉरिशस - पंतप्रधान प्रविंद जुगनाथ

सार्क देश म्हणजे काय ?

सार्क म्हणजे साउथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन. या संघटनेत भारत, अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका हे देश आहेत. 

बिमस्टेक म्हणजे काय ?

बिमस्टेक म्हणजे बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टि सेक्टोरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन. या संघटनेत दक्षिण आशिया आणि आग्नेय आशियातील देश आहेत. 

बिमस्टेक : भारत, बांगलादेश, भूतान, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका, थायलंड


सम्बन्धित सामग्री