मुंबई : आजचा दिवस मुंबईकर प्रवाशांसाठी अत्यंत त्रासाचा ठरणार आहे. रेल्वेच्या दुरुस्ती आणि काही तांत्रिक कामांमुळे मध्य, हार्बर तसेच पश्चिम रेल्वेवर मोठा मेगाब्लॉक जाहीर करण्यात आलेला आहे. जाणून घ्या 27 सप्टेंबर, रविवारचा मुंबई लोकलचा मेगाब्लॉक कसा असेल आणि कोणत्या मार्गावरील लोकलच्या वेळापत्रकात काय बदल होणार?
पाहा नवं वेळापत्रक
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेवरील माटुंगा ते मुलुंड सकाळी 11.05 ते दुपारी 3.45 पर्यंत माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाउन मार्ग बंद राहणार आहेत. सीएसएमटीहून सुटणाऱ्या जलद लोकल या माटुंगा येथे धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि मुलुंडपर्यंत प्रत्येक स्थानकावर थांबतील. ठाणे स्थानकानंतर त्या पुन्हा जलद मार्गावर येतील.
ठाण्याकडून सीएसएमटीच्या दिशेने येणाऱ्या लोकलही मुलुंड स्थानकापासून धीम्या मार्गाने चालतील, त्यामुळे आजच्या प्रवासाला 15 ते 20 मिनिटे जास्त लागण्याची शक्यता आहे. खोपोली 1.48 ची लोकल आता दुपारी 2.06 वाजता सुटेल.
हार्बर मार्ग
हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत कुर्ला ते वाशी या दोन्ही मार्ग बंद राहणार आहेत. तर सीएसएमटी ते वाशी, बेलापूर, पनवेल आणि पनवेल, बेलापूर, वाशी ते सीएसएमटी या सर्व लोकलही रद्द करण्यात आलेल्या आहेत. लोकल प्रवाशांसाठी सीएसएमटी-कुर्ला आणि पनवेल-वाशी या स्थानकादरम्यान विशेष लोकल चालवल्या जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, ट्रान्स हार्बर आणि उरण या मार्गावरील लोकल या वेळापत्रकानुसार सुरु राहतील.
पश्चिम रेल्वेवर रात्रीचा जम्बो ब्लॉक मात्र…
पश्चिम रेल्वेने लोकल प्रवाशांना दिवसा दिलासा दिलेला आहे. आज या मार्गावर दिवसा कोणताही ब्लॉक नाही. मात्र, शनिवारी मध्यरात्री 12.30 ते पहाटे 4.30 पर्यंत वसई रोड ते भाईंदर दरम्यान धीमा मार्ग बंद असणार आहे. या वेळेत धीम्या मार्गावरील लोकल या विरार, वसई ते बोरिवली, भाईंदर दरम्यान जलद मार्गावरुन धावतील आणि काही स्टेशनवर थांबणार नाहीत. त्यामुळे नागरिकांनी रविवारी घराबाहेर पडण्यापूर्वी युटीएस या अॅपवर वेळापत्रक नक्की तपासा.