हृदयद्रावक! 7 वर्षीय मुलाचा खोडकरपणा अन् पत्नीने…; अखेर वडिलांनी घरातचं संपवलं जीवन

Crime News : घरातील लहान मुलांचे हट्ट असोत किंवा कुटुंबातील इतर सदस्यांच्या अपेक्षा. हे हट्ट कधी कोणत्या टोकाला जातील, हे सांगता येत नाही. अशीच एक हृदयद्रावक आणि हादरवून टाकणारी घटना सुरत शहरातून समोर आलेली आहे.
Man Takes Extreme Step After Child Breaks TV
मुलाने टीव्ही तोडला अन् वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल

घरातील लहान मुलांचे हट्ट असोत किंवा कुटुंबातील इतर सदस्यांच्या अपेक्षा. हे हट्ट कधी कोणत्या टोकाला जातील, हे सांगता येत नाही. अशीच एक हृदयद्रावक आणि हादरवून टाकणारी घटना सुरत शहरातून समोर आलेली आहे.

सुरतच्या भेस्तान या परिसरात वास्तव्यास असलेल्या 37 वर्षीय अरविंद प्रजापती यांनी राहत्या घरात गळफास घेत जीवन संपवल्याची घटना समोर आलेली आहे. मात्र, त्यांनी एवढं टोकाचं पाऊल नेमकं का उचललं?यामागचं कारण काय होतं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरणाची माहिती.

नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मृत अरविंद प्रजापती हे भेस्तान या परिसरात आपली पती आणि 7 वर्षांच्या मुलासह राहत होते. अरविंद यांच्या 7 वर्षांच्या मुलाला वारंवार टीव्ही पाहण्याची सवय होती. आपला मुलगा दिवसातील जास्त वेळ हा टीव्ही पाहण्यात वाया घालवत असे, त्यामुळे अरविंदच्या पत्नीने मुलाला ओरडली होती. आईने आपल्याला ओरडल्याचा रागामुळे मुलगा इतका नाराज झाला आणि रागात येत त्याने थेट टीव्हीच तोडून टाकला.

इंथून सुरु झाला ‘तो’ प्रकार
मुलाने टीव्ही तोडल्यानंतर, अरविंदच्या पत्नीने त्यांच्याकडे नवा टीव्ही खरेदी करण्याची मागणी केली. मात्र, या आर्थिक बोजामुळे आणि मुलाच्या वागणुकीमुळे पती-पत्नीमध्ये जोरदार वाद झाला. या प्रकारामळे अरविंद हे नैराश्यात गेले.

अखेर डोक्यात चालत असलेल्या विचांरामुळे अरविंद यांनी घरात जीवन संपवले. घटनेची माहिती मिळताच भेस्तान पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचेल. पोलिसांनी अरविंद यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला असून आकस्मिक मृत्यूची नोंद करत पुढील तपास सुरु केला आहे. या घटनेमुळे संपू्र्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version