मुंबई : बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला आहे. भाजपा आमदार सुरेश धस यांनी सातत्याने कराडवर मकोका लावण्याची मागणी केली होती. आता कराडवर मकोका लागला आहे. हे महाराष्ट्राच्या गृहखात्याचे असल्याचे वक्तव्य भाजपा आमदार सुरेश धस केलं आहे. जय महाराष्ट्र मराठी वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत प्रसाद काथे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना धस असंही म्हणाले की, बीडचं वातावरण खराब करायला मुंडेंची टोळी जबाबदार आहे.
हेही वाचा : धसांनी गुपित फोडलं
आमदार सुरेश धस यांना वंजारी समाजातून होणाऱ्या विरोधाबाबत मुलाखतीत प्रश्न विचारला गेला. ‘हिंमत असेल तर, राजीनामा द्या आणि वंजारी मतांशिवाय निवडून येऊन दाखवा.’ अस आव्हान धस यांना मुंडे समर्थक देत आहेत. आष्टी-पाटोदा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या तिकीटावर सुरेश धस निवडून आले आहेत. ‘विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांमध्ये मराठा आणि वंजारी समाजाचे मतदान आहे असे सांगतानाच धस म्हणाले की ते प्रसंगी आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे. हिंमत असेल तर, विरोधकांनी प्रतिस्पर्धी उमेदवार घोषित करावा.’
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
ही संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...