Sushma Andhare : भोंदू खरातप्रकरणी सुषमा अंधारे पुन्हा आक्रमक; नाव जोडलेल्या संबंधीत राजकीय नेत्यांना सुनावले खडेबोल

भोंदू कॅप्टन अशोक खरातप्रकरण गाजत असतानाच दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत.

Sushma Andhare : भोंदू खरातप्रकरणी सुषमा अंधारे पुन्हा आक्रमक; नाव जोडलेल्या संबंधीत राजकीय नेत्यांना सुनावले खडेबोल

भोंदू कॅप्टन अशोक खरातप्रकरण गाजत असतानाच दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपवण्यात आला असून माहितीत धक्कादायक खुलासे पाहायला मिळत आहेत. यातच आज, मंगळवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेत ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणी नाव जोडलेल्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. यावेळी अंधारे म्हणाल्या की, निव्वळ हुल्डबाजी करायची म्हणून शिंदेच्या कार्यकर्त्यांनी टीका करणाऱ्या पोस्ट केल्या. पण आम्ही केसरकारांना उघड केलं आहे. केसरकर म्हणतात मी एकटा गेलो नाही शिंदेसाहेबांसोबत गेलो. म्हणजे शिंदे आणि खरात यांचे थेट संबंध आहे, असं म्हणायचं आहे का? नामकरण आवारे हा यातला महत्वाची कडी आहे. तो भाजप आघाडीचा प्रमुख होता. शिवनिका ट्रस्टवर देखील आवारे होता. खरात आणि आवारे यांचे व्यावसायिक संबंध आहेत. आवारे याने अनेक उद्योजकांना खरातकडे हात दाखवावे लावले. पुस्तक लिहून आवारे यांनी खरातच्या कथा लिहिल्या. मदिरांचा प्रचार केला व स्वयंभू करण्याच काम आवारे यांनी केलं. राजकीय नेत्यांना देखील त्यानेच मंदिरात आणले. आवारे आणि खरात सारखेच पापाचे भागीदार आहेत, असे अंधारे यांनी नमूद केले. 

2018 ला या मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला गेला. जयकुमार रावल मंत्री असताना हा क दर्जा देण्यात आला. सांगोल्याचे दिपक आबा साळुंके यांचे देखील खरातसोबत आर्थिक संबंध आहेत. खरात यांच्या मुलीला साळुंके यांनी फ्लॅट गिफ्ट दिला. खरातच प्रस्थ जाणीवपूर्वक चाकणकर आणि आवारे यांनी वाढवलं. खरातची चौकशी करा, असं पत्र चाकणकर यांनी का दिलं नाही?. दर 15 दिवसाला तुम्ही नाशिकला जात होता. तेव्हा तुम्ही महिला नव्हता का. हा एसआयटीचा अपमान आहे. जयकुमार रावल यांनी हा दर्जा का दिला. रावल यांची देखील चौकशी झाली पाहिजे. रोहामधे निलेश चाकणकर आणि चौधरी यांची भागीदारी आहे, त्याचीही चौकशी व्हावी. 

हेही वाचा : Ashok Kharat Case: भोंदू अशोक खरातच्या संपर्कातील ते 45 राजकारणी कोण?; मुलीच्या लग्नपत्रिकेवर छापली नेत्यांची नावं, यादी वाचून थक्क व्हाल

“तटकरे यांचा राईट आणि लेफ्ट हँड म्हणजे आकाश चौधरी. मी याबाबत मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. आदिती तटकरे आणि आकाश चौधरी यांच्या अनेक कंपन्यात भागीदारी आहे. गंमतीचा भाग म्हणजे अनिकेत तटकरे आणि आकाश चौधरी यांच्या त्याच नावाच्या कंपन्यात भागीदारी आहे. ये रिश्ता क्या केहलाता है. आता मला यात मुलुंडचे HD व्हिडिओ स्पेशलिस्ट किरीट सोमैया यांची मदत हवी आहे. किरीटजी मित्र पक्षातील देखील फाईली काढा. शिंदेसाहेब स्वतः खरातचे मोठे भक्त आहेत का?, असं केसरकरांना म्हणायचे आहे का? पुण्यातील काही लोकांनी यात आधीच तोडपाणी केलं आहे. आता काही महिलांचं काउंसलिंग करून त्या बाहेर येत आहेत. सृष्टी खरातला फ्लॅट कसा गिफ्ट दिला जातो. या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे,” अशा विविध विषयांवर सुषमा अंधारे यांनी भाष्य केले. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number