ठाणे-भिवंडी-कल्याण प्रवास होणार सुसाट! मेट्रो 5 मार्गावर पहिली गाडी दाखल, स्थानके कोणती?

Mumbai Metro 5 Update : ठाणे आणि आसपासच्या महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या मेट्रो 5 मार्गिकेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकल्पामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर होण्याची अपेक्षा आहे. मार्गिका सुरू करण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून वेगाने हालचाली सुरू असून, पुढील प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे.

ठाणे-भिवंडी-कल्याण प्रवास होणार सुसाट! मेट्रो 5 मार्गावर पहिली गाडी दाखल, स्थानके कोणती?
Thane Metro Update

ठाणे, भिवंडी आणि कल्याणला जोडणाऱ्या मेट्रो 5 मार्गाची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. या मार्गावर पहिली मेट्रो गाडी दाखल झालेली आहे. काही दिवसांमध्येच या मेट्रोच्या चाचणीला सुरुवात होणार असून नवरात्रीच्या मुहूर्तावर ही गाडी आणण्यात आलेली आहे.

ठाणे-भिवंडी-कल्याणकरांची प्रतीक्षा संपणार?
एमएमारडीने दिलेल्या माहितीनुसार, याच महिन्याच्या शेवटी या गाडीच्या तांत्रिक आणि सुरक्षेच्या चाचण्या घेण्यात येतील. त्यानंतर सीएमआरएसकडून अंतिर हिरवा कंदील मिळताच पुढील वर्षाच्या सुरुवातील प्रवासी सेवा सुद्धा सुरु होईल.

हेही वाचा- मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! समृद्धी महामार्गावर वाहतूक ब्लॉक; जाणून घ्या तारखा

मेट्रो 5 चा पहिला टप्पा कसा असणार?
पहिल्या टप्प्यामध्ये ठाणे ते धामणकर नाका हा 11.09 किमीचा मार्ग असणार आहे. यामध्ये बाळकुम, कशेळी, काल्हेर, पूर्णा, अंजूकफाटा आणि धामणकर नाका अशी 6 स्थानके असणार आहे. तब्बल 6741 कोटींच्या या प्रकल्पाचे शेवटच्या टप्प्यातील काम देखील सध्या सुरु आहे.

विशेष म्हणजे, या मार्गासाठी नव्या गाड्या येण्यासाठी काहीसा वेळ आहे. त्यामुळेच सध्या मेट्रो 7 मार्गावर धावणारी गाडी ही या मार्गावर वापरण्यात येत आहे. तर दुसरीकडे कशेली टोल नाक्याजवळ 27 हेक्टरवर कारशेडचे काम हे सुरु आहे. कारशेड पूर्ण होईपर्यंत गाड्यांच्या देखभालीसाठी तात्पुरती पिट लाईन तयार करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number