Maharashtra Municipal Elections : नगरपालिका निवडणूकीत भाजपची धमाकेदार सुरुवात! मतदानापूर्वीच महाराष्ट्रात निकाल स्पष्ट?

आगामी महापालिकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील नगर पंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुकांच्या मतदानापुर्वीच एक मोठी बातमी समोर येत आहे.

Maharashtra Municipal Elections : नगरपालिका निवडणूकीत भाजपची धमाकेदार सुरुवात! मतदानापूर्वीच महाराष्ट्रात निकाल स्पष्ट?

राज्य भरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजत असताना सर्वपक्षांनी प्रचाराला वेग लावला आहे. तर येत्या 2 डिसेंबर रोजी नगर पंचायत  आणि नगर परिषदेसाठी मतदान होणार असून त्याचा निकाल 3 डिसेंबर रोजी लागणार आहे. दरम्यान आगामी महापालिकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील नगर पंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुकांच्या मतदानापुर्वीच एक मोठी बातमी समोर येत आहे.

मतदानापुर्वीच भाजपला महाराष्ट्रात लक्षणीय राजकीय आघाडी मिळाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत भाजपचे 100 च्या आसपास नगराध्यक्ष आणि तीन शहराध्यक्ष बिनविरोध निवडून आले आहेत. मात्र मतदानापुर्वीच हे कसं शक्य झालं? अनेक वॉर्डांमध्ये मतदान आवश्यक नव्हते आणि भाजप उमेदवार कोणत्याही लढाईशिवाय विजयी झाले. विरोधी पक्षांनी राज्यातील अनेक भागात निवडणूक लढवण्याचा धोका पत्करला नाही.

यामुळे भाजपला सुरुवातीच्या टप्प्यात लक्षणीय जागा मिळवता आल्या. ज्यामुळे भाजपला महाराष्ट्रातील अनेक प्रदेशांमधून बिनविरोध विजय मिळाले. यामध्ये उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात या भागांमध्ये पक्षाची संघटनात्मक रचना आणि पकड खूपच प्रभावी असल्यामुळे भाजपने या ठिकाणी भाजपने सर्वाधिक विजय मिळवला. अनेक वॉर्डांमध्ये मतदान आवश्यक नव्हते आणि भाजप उमेदवार कोणत्याही लढाईशिवाय विजयी झाले. दरम्यान भाजपला सुरुवातीच्या टप्प्यात लक्षणीय जागा मिळवता आल्या असल्यामुळे निवडणुकीपूर्वी भाजपने केलेली ही जोरदार सुरुवात विरोधकांसाठी एक मोठे आव्हान म्हणून पाहिली जात आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number