LPG Gas Cylinder: एलपीजी गॅसचा तुटवडा विसरा; केंद्र सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे मिळणार डबल गॅस सिलिंडर

युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम भारतीयांवर मोठ्या प्रमाणात झाल्याचे पाहायला मिळत आहे. गॅस वापराबाबत केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि धोरणात्मक निर्णय घेतला आहे.

LPG Gas Cylinder: एलपीजी गॅसचा तुटवडा विसरा; केंद्र सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे मिळणार डबल गॅस सिलिंडर

आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर होर्मुज सामुद्रधुनी बंद होण्याच्या भीतीमुळे जागतिक बाजारात तेलाच्या किमतींमध्ये तेजी दिसून आली आहे. मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम भारतीयांवर मोठ्या प्रमाणात झाल्याचे पाहायला मिळत आहे. भारतामध्ये अनेक ठिकाणी LPG गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. ज्याचा परिणाम थेट भारतातील खाण्यापिण्यावर झाला आहे. याचपार्श्वभूमिवर गॅस वापराबाबत केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि धोरणात्मक निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांना पत्र पाठवून गॅस सिलिंडरचे दैनंदिन वाटप दुप्पट करण्याचे आदेश दिले आहेत. ज्यामुळे आता 5 किलोच्या गॅस सिलिंडरची संख्या दुप्पट केली आहे.

हेही वाचा- Ammonia Gas Crisis: देशावरील संकट वाढतंय! तेल, गॅसनंतर आता अमोनियाचा भडका, एक सिलेंडर 15000 तर…, शीतगृह उद्योग संकटात
केंद्र सरकारने 5 किलोच्या छोट्या गॅस सिलिंडरचा कोटा डबल केला आहे, ज्यामुळे याचा फायदा प्रवासी, स्थलांतरीत कामगार, विद्यार्थी आणि रोजंदारीवर काम करणाऱ्यांना होणार आहे. तसेच गृहिणींसाठी देखील ही दिलासादायक बातमी आहे. यासाठी तुम्हाला केवळ तुमचे ओळखपत्र दाखवून हा सिलिंडर मिळवता येणार आहे. तसेच यासाठी इतर कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता लागणार नाही. हे सिलिंडर राज्य सरकारांना आणि त्यांच्या अन्न व नागरी पुरवठा विभागांना पुरवले जातील. तसेच स्थलांतरीत कामगार, विद्यार्थी, रोजंदारीवर काम करणाऱ्यांना हे 5 किलोचे एफटीएल सिलिंडर पुरवले जातील. केंद्र सरकारने देशातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ही उपाययोजना केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number