Delhi Terror Blast Case : कार ब्लास्टने दिल्ली हादरवणाऱ्या डॉक्टरचं घर अखेर जमीनदोस्त; पण त्याची ओळख कशी पटली?

देशाची राजधानी असलेली दिल्ली 10 नोव्हेंबर रोजी हादरली.

Delhi Terror Blast Case : कार ब्लास्टने दिल्ली हादरवणाऱ्या डॉक्टरचं घर अखेर जमीनदोस्त; पण त्याची ओळख कशी पटली?

नवी दिल्ली : देशाची राजधानी असलेली दिल्ली 10 नोव्हेंबर रोजी हादरली. दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार ब्लास्टमध्ये 13 ते 20 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. एवढचं नव्हे, तर अनेक जण गंभीर जखमी झाले होते. बॉम्बमध्ये अमोनियम नायट्रेट नावाचा उच्च-तीव्रतेचा स्फोटक होता. या घटनेनंतर या स्फोटासंदर्भात अनेक खुलासे होत असलेले समोर येत आहेत. या प्रकरणाला वेगवेगळे वळण देखील लागत आहेत. अशातच दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी एक मोठी बातमी समोर आली आहे. 

दिल्ली बॉम्बस्फोटात सहभागी असलेल्या डॉ. उमर नबी याचं पुलवामा येथील घर जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील सुरक्षा दलांनी पाडलं असल्याची माहिती 14 नोव्हेंबर 2025 रोजी अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्याच्या घराची तोडफोड गुरुवारी 13 नोव्हेंबरपासून करण्यात आली. डॉ. नबी स्फोटकांनी भरलेली हुंडई आय20 गाडी चालवत होता. घटनास्थळावरून घेतलेले डीएनए नमुने डॉ. नबी यांच्या आईच्या डीएनए नमुन्यांशी जुळल्यानंतर त्याची ओळख पटली. त्याच्या वर्तुळात एक शैक्षणिकदृष्ट्या यशस्वी व्यावसायिक म्हणून ओळखले जाणारे डॉ. नबी गेल्या दोन वर्षांत कट्टरपंथी बनले असल्याचा आरोप आहे. तपासकर्त्यांनी सांगितले की, तो सोशल मीडियावरील अनेक कट्टरपंथी मेसेजिंग ग्रुपमध्ये सामील झाला होता.

हेही वाचा : PM Narendra Modi : भारताच्या पहिल्या पंतप्रधानांना 125 व्या जयंतीनिमित्त नरेंद्र मोदीं यांनी वाहिली आदरांजली

दिल्लीमधील लाल किल्ला परिसरात एका कारमध्ये मोठा स्फोट झाला होता. हा स्फोट एवढा मोठा होता की, लाल जैन मंदिर आणि दुकानांच्या काचाही फुटल्या. ज्या ठिकाणी हा स्फोट झाला ते ठिकाण लाल किल्ल्यापासून फक्त 800 मिटर अंतरावर होता. त्यामुळे या स्फोटाकडे संशयाच्या नजरेतून पाहिलं जात आहे. स्फोट होण्यापुर्वी गेले काही तास लाल किल्ला परिसरात मेट्रोच्या गेट क्रमांक एकवर एक कार उभी होती. याच कारमध्ये हा स्फोट झाला असून या स्फोटामुळे आजूबाजूच्या तीन गाड्यांना आग लागल्याची घटना घडली. विशेषतः सायंकाळच्या सुमारास या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमते. अशावेळी हा स्फोट झाल्याने याठिकाणी खळबळ उडाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number