नवी दिल्ली : राज्यसभेत वारंवार होणाऱ्या गदारोळावर सभापती जगदीप धनखड यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सदस्यांना खडे बोल सुनावले आहेत. सदस्य सभागृहात गोंधळ घालून कामकाजाचा वेळ वाया घालवत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
राज्यसभेत गदारोळ झाल्यानंतर अपेक्षेप्रमाणे आपली कर्तव्ये पार पाडण्याची शपथ प्रत्यक्षात आणली पाहिजे असे जगदीप धनखड म्हणाले. नियम 267 चा उपयोग व्यत्यय निर्माण करणारे अस्त्र म्हणून केला जात आहे. दैनंदिन कामकाजात अडथळा निर्माण करण्यासाठी याचा वापर होतो. सदनातला गदारोळ ही अत्यंत चिंतेची बाब असल्याचे धनखड यांनी म्हटले आहे. सदस्यांनी त्यांच्या वागण्याचे सखोल चिंतन करावे. या देशातील लोकांचा आपण अपमान करत आहोत. त्यांच्या अपेक्षांची पूर्तता आपण करत नाही असे राज्यभा सभापती जगदीप धनखड यांनी म्हटले आहे.
काय म्हणालेत सभापती धनखड?
अपेक्षेप्रमाणे आपण आपली कर्तव्ये पार पाडण्याची शपथ प्रत्यक्षात आणली पाहिजे
नियम 267 चा उपयोग व्यत्यय निर्माण करणारे अस्त्र म्हणून केला जातोय
दैनंदिन कामकाजात अडथळा निर्माण करण्यासाठी याचा वापर होतोय
सदनातला गदारोळ ही अत्यंत चिंतेची बाब आहे, सदस्यांनी सखोल चिंतन करावे
या देशातील लोकांचा आपण अपमान करत आहोत
त्यांच्या अपेक्षांची पूर्तता आपण करत नाही
आपली कृती लोककेंद्रित नाही