अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार! दुचाकीवरुन आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या; बॉलिवूडमध्ये खळबळ

Tiger Shroff Firing Incident : मुंबईतील जुहू परिसरात अभिनेता टायगर श्रॉफशी संबंधित गोळीबाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार! दुचाकीवरुन आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या; बॉलिवूडमध्ये खळबळ
Tiger Shroff

अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर जुहू येथे गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जुहू परिसरातील पुष्पा पार्क येथे ही संपूर्ण घटना घडली असून सुदैवाने यात टायगर श्रॉफ जखमी झाला नाही. या हल्ल्यावेळी टायगर श्रॉफ आणि त्याचा चालकच वाहनात होते, अशी माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीवरुन आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गाडीवर गोळीबार केला. या गोळीबारात कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिलेली आहे. गोळीबाराचे कारण अजूही अस्पष्ट आहे. दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारल्याची माहिती आहे. मात्र अजूनही संपूर्ण स्पष्ट झाले नाही. या घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सुरक्षा वाढवली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number