CSMT वरून प्रवास करताय? लक्ष द्या, मध्य रेल्वेवर 75 दिवसांचा ब्लॉक, पाहा एक्सप्रेस रेल्वेचे सुधारित वेळापत्रक

CSMT पुनर्विकास आणि आधुनिकीकरणासाठी मोठा ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

CSMT वरून प्रवास करताय? लक्ष द्या, मध्य रेल्वेवर 75 दिवसांचा ब्लॉक, पाहा एक्सप्रेस रेल्वेचे सुधारित वेळापत्रक
Central Railway

CSMT पुनर्विकास आणि आधुनिकीकरणासाठी मोठा ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या पॉवर ब्लॉकमुळे CSMT वरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी याची दखल घ्यायला हवी. तसेच प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सुधारित वेळापत्रक पाहूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

ब्लॉकचा कालावधी व प्लॅटफॉर्म क्रमांक?
मध्य रेल्वेवर 75 दिवसांचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक होणार आहे. हा 75 दिवसांचा ब्लॉक असून 1 ऑक्टोबर ते 15 डिसेंबर 2026 या कालावधीत होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि 15 वर पुनर्विकास कामासाठी ब्लॉक असणार आहे.

RLDA च्या पुनर्विकास प्रकल्पाच्या टप्पा-1 अंतर्गत हे काम होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यात प्लॅटफॉर्म क्रमांक 14, 15 आणि स्टेब्लिंग लाइन 15 वर पायाभरणीचे काम होणार आहे. त्यामुळे काम पूर्ण होईपर्यंत प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि 15 वरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद असून, या मार्गावरील निवडक मेल/एक्सप्रेस गाड्यांचे दादर आणि ठाणे येथे शॉर्ट टर्मिनेशन केले गेले आहे.

दादर येथे शॉर्ट टर्मिनेट होणाऱ्या गाड्या :
11002 बल्लारशाह–CSMT नंदीग्राम एक्सप्रेस
12810 हावडा–CSMT एक्सप्रेस
12112 अमरावती–CSMT एक्सप्रेस
11020 भुवनेश्वर–CSMT कोणार्क एक्सप्रेस
22120 मडगाव–CSMT तेजस एक्सप्रेस
22144 बिदर–CSMT एक्सप्रेस
22108 लातूर–CSMT एक्सप्रेस

ठाणे येथे शॉर्ट टर्मिनेट होणाऱ्या गाड्या:
12134 मंगळुरू–CSMT एक्सप्रेस

 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number