‘चोरी करायची अन् पोलीसही आपलेच…’; ; उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांसह निवडणूक आयोगावर निशाणा

आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी देशभरातून तब्बल 13 कोटी मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा अत्यंत गंभीर आरोप केला.
‘चोरी करायची अन् पोलीसही आपलेच…’; ; उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांसह निवडणूक आयोगावर निशाणा
Uddhav Thackeray Garjana Morcha speech

मुंबईत पार पडलेल्या विरोधकांच्या संयुक्त महामोर्च्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. मुंबईतील भव्य जनसागराला संबोधित करताना ठाकरे म्हणाले की, हा केवळ राजकीय मोर्चा नसून देशाची लोकशाही आणि स्वातंत्र्य वाचवण्यासाठी पुकारलेला लढा आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर घणाघाती टीका करताना त्यांनी सरकारवर पक्षपातीपणाचा आरोप केला. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नेमणूक प्रक्रियेतून सरन्यायाधीशांना बाहेर काढण्याच्या निर्णयावर त्यांनी जोरदार आक्षेप घेतला आणि ही हुकूमशाही मोडून काढण्याचा इशारा दिला.

मतदार याद्यांमधील घोळ अन् गृहमंत्र्यांवर निशाणा

आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी देशभरातून तब्बल 13 कोटी मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा अत्यंत गंभीर आरोप केला. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील स्थानिक राजकीय परिस्थितीचा उल्लेख करत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या धोरणांवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. देशाच्या सीमा सुरक्षित असताना बांगलादेशी घुसखोर महाराष्ट्रात कसे येतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ‘मेक इन इंडिया’च्या नावाखाली देशात एकाधिकारशाही चालवली जात असून, राम मंदिरातील दानापासून ते राजकीय पक्षांपर्यंत सर्वच गोष्टींची चोरी केली जात असल्याची टीका त्यांनी केली.

हेही वाचा – ‘जो डाले वोट पे डाका, वो है ज्ञानू काका’; अनिल देशमुखांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर कवितेतून निशाणा

‘हा केवळ पहिलाच मोर्चा, सत्ताधाऱ्यांना झुकवल्याशिवाय शांत बसणार नाही’; ठाकरेंचा तीव्र इशारा

राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर बोट ठेवताना ठाकरेंनी पूर्णेकर हत्या प्रकरण आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवरून प्रशासनाला धारेवर धरले. वाढत्या उन्हातही उपस्थित राहिलेल्या कार्यकर्त्यांचे आभार मानत त्यांनी सांगितले की, जोपर्यंत जनता आक्रमक होत नाही तोपर्यंत देशात बदल घडणार नाही. हा सत्ताधाऱ्यांविरोधातील केवळ पहिलाच मोर्चा असून तो शेवटचा नाही, असा इशारा देत त्यांनी या सरकारला गुडघे टेकायला लावल्याशिवाय विरोधक शांत बसणार नाहीत, असा निर्धार सभेच्या शेवटी व्यक्त केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version