Reel साठी 30 फूट उंचीवरून धरणात उडी…, पण पाण्याचा अंदाज चुकला…, अंगलट आला जीवघेणा स्टंट; तरुणाचे दोन्ही पाय…

उडी मारल्यानंतर दोन्ही पाय निकामी झाल्यामुळे पुष्पेंद्रला पाण्यात कोणतीही हालचाल करणे अशक्य झाले आणि तो बुडू लागला. अत्यंत प्रसंगावधान राखून त्याने...

Reel साठी 30 फूट उंचीवरून धरणात उडी…, पण पाण्याचा अंदाज चुकला…, अंगलट आला जीवघेणा स्टंट; तरुणाचे दोन्ही पाय…

Jhansi Pahuj Dam Reel Stunt: सोशल मीडियावर लोकप्रिय होण्यासाठी, लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी तरुण पिढी आजकाल कोणत्याही थराला जात असल्याचे चित्र ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे. अनेकदा अशा स्टंटबाजीच्या नादात गंभीर अपघात घडतात. असाच एक अत्यंत धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील झाशी येथून समोर आला आहे. रील बनवण्याच्या शर्यतीत एका तरुणाने थेट 30 फूट उंचीवरून धरणाच्या पाण्यात उडी मारली. मात्र, पाण्याच्या खोलीचा आणि तळाशी असलेल्या खडकांचा अंदाज न आल्यामुळे हा थरारक प्रयत्न थेट त्याच्या जीवावर बेतला आहे.  

झाशीच्या पहूज धरणातील दुर्घटना; पाण्याचा अंदाज चुकल्याने अपघात  
उत्तर प्रदेशातील झाशी भागात राहणारा पुष्पेंद्र नावाचा 32 वर्षीय तरुण रविवारी आपल्या मित्रांसोबत पहूज धरणावर फिरायला गेला होता. तिथे पोहोचल्यानंतर एका थरारक रीलची निर्मिती करण्यासाठी त्याने धरणाच्या संरक्षण भिंतीवरील रेलिंगवर चढून खाली उडी मारण्याचा निर्णय घेतला. तब्बल 30 ते 32 फूट उंचीवरून जेव्हा त्याने धरणात झेप घेतली, तेव्हा पाण्याचा अचूक अंदाज न आल्याने तो तळाशी असलेल्या कठीण भागावर आपटला. या भीषण आघातामुळे त्याच्या दोन्ही पायांची हाडे जागीच फ्रॅक्चर झाली.

हेही वाचा – Radhika Merchant : राधिका मर्चंटचे मौल्यवान पांढऱ्या सोन्याचे खड्याळ; 1,700 हून अधिक हिरे – पाचू जडवलेल्या दुर्मिळ घड्याळाची किंमत बघून व्हाल अवाक्

पाण्यात बुडताना हातांच्या साहाय्याने वाचवला जीव; कॅमेऱ्यात कैद झाला प्रकार  
उडी मारल्यानंतर दोन्ही पाय निकामी झाल्यामुळे पुष्पेंद्रला पाण्यात कोणतीही हालचाल करणे अशक्य झाले आणि तो बुडू लागला. अत्यंत प्रसंगावधान राखून त्याने केवळ हातांचा वापर करत पाण्यावर तरंगणे सुरू ठेवले. शेवटी तेथे उपस्थित असणारे इतर नागरिक आणि मित्रांनी त्याला तातडीने पाण्याच्या बाहेर काढले. हा संपूर्ण घटनाक्रम त्याच्या मित्रांनी मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला होता. विशेष म्हणजे, उडी मारण्यापूर्वीच त्याचा एक मित्र गमतीने “देव तुझ्या आत्म्यास शांती देवो” असे म्हणताना या व्हिडिओमध्ये स्पष्ट ऐकू येत आहे.  

एका पायावर तातडीने शस्त्रक्रिया; दुसऱ्या पायावर उपचार अद्याप बाकी
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी पुष्पेंद्रला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी घेतलेल्या एक्स-रे अहवालात त्याचे दोन्ही पाय गंभीररीत्या फ्रॅक्चर झाल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या एका पायावर तातडीने शस्त्रक्रिया करून लोखंडी रॉड बसवण्यात आला आहे, तर दुसऱ्या पायाची शस्त्रक्रिया अद्याप होणे बाकी आहे. क्षणिक प्रसिद्धीसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या अशा जीवघेण्या रील स्टंट्सवर आता सर्वच स्तरातून तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा – National Film Awards 2026 : आता पुरस्कार सोहळेदेखील रंगणार गुजरातमध्ये; इतिहासात प्रथमच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा दिल्लीबाहेर आयोजित

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number