Tuesday, December 09, 2025 10:50:14 AM

Share Market Today : बाजार कोसळला ! ट्रम्पच्या 100% टॅरिफ बॉम्बचा शेअर मार्केटवर परिणाम

गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या एच1-बी व्हिसा निर्बंधांनंतर ट्रम्प यांनी केलेली ही दुसरी मोठी घोषणा आहे, ज्यामुळे बाजाराला धक्का बसला आहे.

share market today  बाजार कोसळला  ट्रम्पच्या 100 टॅरिफ बॉम्बचा शेअर मार्केटवर परिणाम

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी औषधांवर 100% कर लादण्याची घोषणा केल्यानंतर बाजारावर दबाव आला आणि बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी हे दोन्ही प्रमुख निर्देशांक घसरणीने उघडले. गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या एच1-बी व्हिसा निर्बंधांनंतर ट्रम्प यांनी केलेली ही दुसरी मोठी घोषणा आहे, ज्यामुळे बाजाराला धक्का बसला आहे. 

आज, सुरुवातीच्या व्यवहारात, सेन्सेक्स 329.66  अंकांनी घसरून 80,830.02 वर आणि निफ्टी 105.7  अंकांनी घसरून 24,785.15 वर बंद झाला. बँक निफ्टी देखील 178.30 अंकांनी घसरून 54797.90 वर उघडला. सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या 30 कंपन्यांपैकी सन फार्माचे शेअर्स तीन टक्क्यांहून अधिक घसरले.

हेही वाचा - Ladki Bahin Scheme 'लाडकी बहीण' योजनेत मोठा गैरव्यवहार; सरकारकडून 8 हजार सरकारी कर्मचाऱ्यांकडून सुमारे 15 कोटी होणार परत वसुल

निफ्टी फार्मा इंडेक्स 2.6% घसरला, नॅटको फार्मा, लॉरस लॅब्स, सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज, ग्लँड फार्मा, आयपीसीए लॅबोरेटरीज आणि बायोकॉनचे शेअर्स प्रत्येकी 3% पेक्षा जास्त घसरले.अमेरिकेतील मजबूत आकडेवारी आणि व्याजदर कपातीची कमी अपेक्षा यामुळे डॉलर मजबूत झाला आहे, ज्यामुळे सोन्याच्या किमती कमी झाल्या आहेत. आठवड्यात सोन्याच्या किमतीत अजूनही 1.7% वाढ झाली आहे.

हेही वाचा - Diwali Bonus : राज्य सरकारची मोठी घोषणा! यंदाची दिवाळी ठरणार अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांठी खास 

बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांनाही मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. बीएसईच्या आकडेवारीनुसार, एका दिवसापूर्वी बीएसईचे मार्केट कॅप 457,356,69.91 कोटी होते, परंतु ट्रेडिंग सत्रादरम्यान ते 453,441,73.1 कोटींवर घसरले.
याचा अर्थ असा की, ट्रेडिंग सत्रादरम्यान बीएसईच्या मार्केट कॅपमध्ये अंदाजे 4 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. गुंतवणूकदारांनाही तेवढेच नुकसान झाले. ट्रेडिंग सत्रादरम्यान हा तोटा वाढू शकतो असे तज्ञांचे मत आहे.


 


सम्बन्धित सामग्री