उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यातील धानापूर येथून धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. डिग्री नसताना ही रुग्णावर शस्त्रक्रिया केल्याप्रकरणी पोलिसांना एका बोगस डॉक्टरला अटक करत तुरुंगात पाठवण्यात आले आहे. चुकीची नस कापली गेल्याने आणि किडनीला इजा झाल्याने एका 29 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्या आरोप करण्यात आला. आरोग्य विभागाने केलेल्या चौकशीनंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
लखईपूर या गावातील रहिवासी असलेल्या चंद्रवली बिंद यांची मुलगी सुमन हिची प्रकृती खालावल्याने तिला कुटुंबीयांनी 18 ऑगस्ट रोजी महरैया तेथील एका रुग्णालयात दाखल केले होते. दुसऱ्या दिवशी,म्हणजे 10 ऑगस्ट रोजी रुग्णालयातील इंद्रजित प्रजापती याने तरुणीचे ऑपरेशन केले. मात्र, ऑपरेशननंतर सुमनची तब्येत अचानक खूपच बिघडली आणि त्याच रात्री तिचा मृत्यू झाला. सुमनच्या कुटुंबीयांनी या प्रकाराबाबत संशय आला आणि त्यांनी आरोग्य विभागाकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत मुख्य वैद्यकीय अधिकारी असलेल्यांनी तातडीने चौकशी समिती स्थापन केली.
चौकशीत धक्कादायक खुलासा
तपासादरम्यान समोर आले की, सुमनच्या शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरकडूनच चुकीची नस कापली गेली होती, ज्यामुळे किडनीचेही मोठे नुकसान झाले होते. हाच निष्काळजीपणा तरुणीच्या मृत्यूचे कारण ठरले शिवाय इंद्रजित प्रजापतीकडे कोणतीही वैध वैद्यकीय पदवी नसल्याचे समोर आले. तो डॉक्टर नसतानासुद्धा स्वत:ला डॉक्टर म्हणून रुग्णांवर एवढे दिवस उपचार करत होता.या अहवालाच्या आधारे आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे.
पोलिसांची कारवाई
पोलिसांनी आज संबंधित रुग्णालयातून इंद्रजित प्रजापतीला अटक केली आहे. चौकशीत त्याने डॉक्टर नसतानाही ऑपरेशन केल्याची कबूली दिली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून हॉस्पिटल चालकाकडे वैध डिग्री आढळली नाही, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.