Vaishno Devi Pilgrim: मोठा निर्णय! माता वैष्णो देवी यात्रेकरूंच्या विमा संरक्षणात दुप्पट वाढ; पाच लाखांऐवजी मिळणार 10 लाख

उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून विविध विकास प्रकल्पांनाही मंजुरी देण्यात आली.

Vaishno Devi Pilgrim: मोठा निर्णय! माता वैष्णो देवी यात्रेकरूंच्या विमा संरक्षणात दुप्पट वाढ; पाच लाखांऐवजी मिळणार 10 लाख

जम्मू: माता वैष्णो देवी धामला भेट देणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. वैष्णो देवी बोर्डने यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा निर्णय घेत विमा संरक्षणाची रक्कम पाच लाखांवरून थेट 10 लाख रुपये प्रति व्यक्ती इतकी वाढवण्यास मंजुरी दिली आहे. हा निर्णय जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

श्राइन बोर्डाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, मागील बैठकीनंतर झालेल्या कामांचा आढावा घेऊन एकूण 25 अजेंडा मुद्द्यांवर महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यात्रेकरूंच्या सुविधांमध्ये सुधारणा आणि व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यावर विशेष भर देण्यात आला.

मंदिर परिसरातील (Bhawan) नवीन बाहेर पडण्याचा मार्ग, सांझीछत ते भवन मार्गाचे रुंदीकरण, कटरा येथे श्री शंकराचार्य मंदिर उभारणी आणि जम्मूतील चैतन्य आश्रम येथे दिव्यांगांसाठी शाळा उभारणी यांसारख्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला.

हेही वाचा: Mahashivratri 2026: महाशिवरात्रीला शिवकृपा हवी? 'या' वेळेत करा जलाभिषेक, जाणून घ्या शुभ मुहूर्त

हेलिकॉप्टर सेवांबाबतही महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. हट्ट गावातील नव्या हेलिपॅडवरून दोन्ही तीर्थस्थळांसाठी सेवा सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली. सुधारित करारावर स्वाक्षऱ्या झाल्यानंतर श्राइन अधिनियमांतर्गत श्री शिव खोरी श्राइन बोर्डाला पायाभूत सुविधा उभारणीसाठी एकरकमी आर्थिक अनुदान दिले जाईल.

उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी कटरा आणि आसपासच्या परिसरात स्वच्छता (Cleanliness) आणि हरित उपक्रम (Green Initiatives) राबवण्यावर विशेष भर देण्याचे निर्देश दिले. पर्यावरणीय स्थिरता (Environmental Sustainability) राखत यात्रेकरूंना अधिक सुरक्षित आणि सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

विमा रकमेची दुप्पट वाढ आणि पायाभूत सुविधांतील सुधारणा यामुळे वैष्णो देवी यात्रेला येणाऱ्या लाखो भाविकांना अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह वातावरण मिळणार आहे. श्राइन बोर्डाचा हा निर्णय यात्रेकरूंच्या दृष्टीने मोठा दिलासा मानला जात आहे.

हेही वाचा: Vegetable Storage Tips: आठवड्याभरात भाजी खराब होते? ‘या’ 5 ट्रिक्स वापरा आणि भाजी ठेवा 2 आठवडे टवटवीत

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number