Saturday, June 14, 2025 03:52:52 AM

Vat Purnima 2025: वटपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या प्रियजनांना पाठवा 'हे' टॉप संदेश

वटपौर्णिमा हा मकरसंक्रातीनंतरचा स्त्रियांसाठीचा सर्वात महत्त्वाचा सण आहे. या सणाला स्त्रियांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतो. आपल्या पतीचा आयुष्यासाठी हे व्रत केले जाते.

vat purnima 2025 वटपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या प्रियजनांना पाठवा हे टॉप संदेश

Vat Purnima 2025: वटपौर्णिमा हा मकरसंक्रातीनंतरचा स्त्रियांसाठीचा सर्वात महत्त्वाचा सण आहे. या सणाला स्त्रियांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतो. आपल्या पतीचा आयुष्यासाठी हे व्रत केले जाते. सती सावित्रीच्या आपल्या पतीसाठी केलेल्या कार्याला समर्पित करणारा दिवस म्हणजे वटसावित्री पौर्णिमा होय. महाराष्ट्रात हा सण खूप मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. महिला वडाला प्रदक्षिणा घालून पुजा-अर्चा करुन उपवासही करतात. या सणाला खास पौराणिक महत्व आहे आणि त्यावरच हा सण आधारलेला आहे.

हा सण केवळ महाराष्ट्रातच नाही तर गुजरातमधील विवाहित महिलाही हा उपवास करतात. पती सत्यवानाला मृत्युदेवता यम यांच्यापासून वाचवणाऱ्या सती सावित्रीच्या शौर्याचा, भक्तीचा आणि त्यांना स्मरण करण्याचा हा दिवस आहे. वटवृक्षाची पूजा करुन महिला त्यांच्या पतीच्या आरोग्यासाठी प्रार्थना करतात.

या वट पौर्णिमेनिमित्त आम्ही तुमच्यासाठी काही खास शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत. ते तुम्ही तुमच्या प्रियजन आणि मित्रांना तसेच मैत्रिणींना शेअर करु शकता आणि त्यांना मंगल आरोग्यासाठी आणि जीवनासाठी शुभेच्छा संदेश देऊ शकता.

हेही वाचा : Vat Purnima 2025: वट पौर्णिमेला 'या' महत्वाच्या नियमांचे पालन करा नाहीतर व्रताचे फळ मिळणार नाही

मित्र आणि कुटुंबियांना वट सावित्री पौर्णिमा व्रताच्या शुभेच्छा, संदेश आणि कोट्स
1. तुम्हाला आणि तुमच्या पतीला दीर्घायुष्य लाभो, तुम्हाला वट सावित्री पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा..!

2. तुमचा संसार वटवृक्षासारखा बहरो, ज्या पतीसाठी तुम्ही वडाला प्रदक्षिणा घालता, त्या तुमच्या पती परमेश्वराच्या आयुष्यात सतत ऊर्जा, सकारात्मकता आणि आर्थिक स्थेर्य लाभो. तुम्हाला वट सावित्री पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा..!

3. वट सावित्री पोर्णिमेचा सण प्रत्येक महिलेसाठी आनंदाचा आणि उत्साहाचा क्षण.. हा क्षण दररोज तुमच्या आयुष्यात येत राहो. तुम्हाला वट सावित्री पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा..!

4. सत्यवान आणि सती सावित्रीसारखे नाते तुमच्यात नेहमी राहो. तुम्हाला वट सावित्री पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा..!

5. वटसावित्री पौर्णिमेच्या शुभ मुहुर्तावर तुमच्या जीवनात सदैव सुख आणि ऐश्वर्य नांदो, तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्हाला वट सावित्री पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा..!

6. तुमचे जीवन वटवृक्षांसारखे विशाल आणि धनसंपदेने भरलेले राहो, सुदृढ आरोग्य लाभो. तुम्हाला वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा..!

7. तुमच्या सर्व व्यावसायिक आणि वैयक्तिक प्रयत्नांमध्ये प्रगती होवो, वैवाहिक जीवनात सुखाची बरसात होवो. तुम्हाला वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा..!

8. सावित्री पौर्णिमा व्रताच्या निमित्ताने, भगवान ब्रह्मा, भगवान विष्णू आणि भगवान शिव तुम्हाला त्यांच्या सर्वोत्तम आशीर्वादांनी बरसावेत. तुम्हाला वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा..!

9. या वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी, मी आशा करते आणि प्रार्थना करते की, देवी सावित्री आणि ईश्वर तुम्हाला व तुमच्या प्रियजनांना सदैव आशीर्वाद देत राहो. तुम्हाला वट सावित्री पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा..!

10. वटपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या जीवनात आनंदाचा वटवृक्ष डौलत राहो. तुम्हाला हवे ते मिळावे, हीच माझी ईश्वरचरणी मनोभावे मनोकामना, तुम्हाला वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा..!

 

(Disclaimer: वरील सर्व माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून जय महाराष्ट्र कोणताही दावा करत नाही किंवा कोणत्याही प्रकारची जबाबदारी स्वीकारत नाही.)


सम्बन्धित सामग्री