Sunday, January 25, 2026 09:38:36 AM

Vijay Hazare Trophy: विराट कोहली आणि ऋषभ पंत विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळणार; 'या' मैदानावर रंगणार सामना

विराट आणि ऋषभ पंत दोघेही ट्रॉफीच्या पहिल्या तीन सामन्यांमध्ये भाग घेऊ शकतात. तसेच, काही स्टँड्स प्रेक्षकांसाठी उघडे राहणार असून अंदाजे 2000 ते 3000 प्रेक्षक उपस्थित राहू शकतात.

vijay hazare trophy विराट कोहली आणि ऋषभ पंत विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळणार या मैदानावर रंगणार सामना

Vijay Hazare Trophy: भारतीय क्रिकेटचे दिग्गज विराट कोहली आणि विकेटकीपर-फलंदाज ऋषभ पंत लवकरच विजय हजारे ट्रॉफीमध्ये दिल्लीकडून खेळताना पाहायला मिळतील. त्यांच्या होम ग्राउंड, बंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर सामने पुन्हा सुरू होणार असल्याचे कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या (केएससीए) नवीन अध्यक्ष वेंकटेश प्रसाद यांनी सांगितले आहे.

केएससीएच्या वतीने राज्य सरकारकडून स्टेडियमवर सामने आयोजित करण्यास मंजुरी मिळाल्यानंतर, प्रारंभी काही सामने अलूर येथे होणार असून विराट कोहलीचे सामने चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळले जाण्याची अपेक्षा आहे. विराट आणि ऋषभ पंत दोघेही ट्रॉफीच्या पहिल्या तीन सामन्यांमध्ये भाग घेऊ शकतात. तसेच, काही स्टँड्स प्रेक्षकांसाठी उघडे राहणार असून अंदाजे 2000 ते 3000 प्रेक्षक उपस्थित राहू शकतात.

हेही वाचा - Sunil Gavaskar: मोठा निर्णय! सुनील गावस्कर यांच्याबाबत बनावट कंटेंट हटवण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश

पूर्वी न्यायमूर्ती जॉन मायकेल डी'कुन्हा आयोगाने स्टेडियम मोठ्या कार्यक्रमांसाठी अयोग्य असल्याचे सांगितले होते. जून महिन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) च्या आयपीएल विजय उत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला होता तर, अनेक जण जखमी झाले होते. त्यानंतर स्टेडियमवर कोणतेही मोठे क्रिकेट सामने आयोजित होऊ शकले नाहीत.

हेही वाचा - Lionel Messi: कोलकात्यात मेस्सी दौऱ्यादरम्यान चाहत्यांचा मोठा गोंधळ; खुर्च्या आणि पाण्याच्या बाटल्या फेकल्या

दरम्यान, आता केएससीए समितीने वेंकटेश प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली आवश्यक सुधारणा केल्या असून, न्यायालयाच्या अहवालानुसार सुरक्षा व्यवस्था सुधारण्यात आल्या आहेत. यामुळे चिन्नास्वामी स्टेडियम पुन्हा क्रिकेट सामने आयोजित करण्यास योग्य ठरला आहे. आता स्टेडियमवर सामना खेळण्यास मंजूरी मिळाल्याने चाहत्यांना विराट कोहली आणि ऋषभ पंत यांना पुन्हा प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळणार आहे, तथापी, बंगळुरूकरांसाठी हा सामना अधिक उत्साहवर्धक क्षण ठरणार आहे.


सम्बन्धित सामग्री