Tuesday, November 11, 2025 10:44:58 PM

Indian Railway : बोगदा किंवा पुलावरून जाताना रेल्वेचा वेग का कमी केला जातो? यामागचं वैज्ञानिक कारण जाणून घ्या

रेल्वे प्रवासादरम्यान, तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, ट्रेन बोगद्यात प्रवेश करताना किंवा पुलावरून जाताना तिचा वेग आपोआप कमी होतो. चाकांचा आवाज मंदावतो आणि काही क्षणांसाठी प्रवास शांत वाटतो.

indian railway  बोगदा किंवा पुलावरून जाताना रेल्वेचा वेग का कमी केला जातो यामागचं वैज्ञानिक कारण जाणून घ्या

मुंबई: रेल्वे प्रवासादरम्यान, तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, ट्रेन बोगद्यात प्रवेश करताना किंवा पुलावरून जाताना तिचा वेग आपोआप कमी होतो. चाकांचा आवाज मंदावतो आणि काही क्षणांसाठी प्रवास शांत वाटतो. पण हे केवळ योगायोग नसून भारतीय रेल्वेच्या सुरक्षिततेसाठी तयार केलेल्या महत्त्वाच्या नियमांचा भाग आहे.

भारतीय रेल्वेने प्रत्येक ट्रॅक, पूल आणि बोगदा विशिष्ट भार सहनक्षमतेनुसार डिझाइन केलेला असतो. ट्रेनचा वेग कमी केल्याने तिचे संपूर्ण वजन संपूर्ण रचनेत समान प्रमाणात वितरित होते. त्यामुळे, पुलाच्या खांबावर आणि पुलाला जोडणाऱ्या भागांवरचा ताण कमी होतो. याउलट, जास्त वेगाने जाणारी ट्रेन जोरदार हलते आणि गतिमान शक्ती निर्माण करते, ज्यामुळे जुन्या किंवा अरुंद पुलांवर धोका वाढू शकतो. त्यामुळे इंजिनिअर्स सुरक्षिततेसाठी ट्रेनचा वेग मर्यादित ठेवतात.

बोगद्यांच्या बाबतीतही अशीच काळजी घेतली जाते. बोगद्यात ट्रेन गेल्यानंतर हवेचा दाब झपाट्याने बदलतो. जर ट्रेन जास्त वेगाने गेली, तर हवेतील अचानक झालेला हा बदल कंपने आणि टर्ब्युलन्स निर्माण करू शकतो, ज्यामुळे प्रवाशांना अस्वस्थता जाणवते. कमी वेगाने हवेचा दाब हळूहळू स्थिर होत असल्याने प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायक होतो.

हेही वाचा: Travel Credit Card: विमान प्रवासात मोठी बचत! 'ही' 6 क्रेडिट कार्ड्स देतील सवलत, रिवॉर्ड्स आणि फ्री फ्लाइट व्हाउचर

याशिवाय, बोगदे आणि पूल या ठिकाणी अनेकदा कमी प्रकाश, वळणे किंवा उतार असतात. अशा परिस्थितीत चालकाला पुढील सिग्नल, काम करणारे कर्मचारी किंवा अडथळे ओळखण्यासाठी जास्त वेळ लागतो. त्यामुळे वेग कमी ठेवणे म्हणजे चालकाला ट्रेनवर अधिक चांगले नियंत्रण मिळवून देणे होय. हवामानातील बदलांमुळे पुलांच्या लोखंडी आणि काँक्रीटच्या भागांमध्ये घट्ट होते आणि ताणले जाते. यासाठी ट्रॅकवर 'एक्पान्शन गॅप्स' ठेवलेले असतात. ट्रेन जास्त वेगाने गेल्यास या सांध्यांवर दाब वाढतो आणि रुळ विस्कटण्याचा धोका निर्माण होतो. कमी वेगाने गेल्यास हा दाब नियंत्रित राहतो आणि ट्रॅक सुरक्षित राहतो. यामुळे, बोगदे आणि पूलावरून जाताना रेल्वेची स्पिड कमी केली जाते.


सम्बन्धित सामग्री