पुणे : पुण्यातील भोर तालुक्यात वाढाणे गावात वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामुळे घराची भिंत कोसळली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही. ही भिंत कोसळल्याने रत्नाबाई पंढरीनाथ बोडके यांच्या घरातील कपडे, धान्य भिजले. त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाले. रत्नाबाई बोडके या निराधार असून त्यांची आर्थिक परिस्थितीही हलाखीची आहे. शासनाने तात्काळ नुकसानीचा पंचनामा करून त्यांना मदत करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.