Gold Rate Today: सणासुदीच्या काळात सोनं-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ नोंदवण्यात आली असून 24 कॅरेट 1 तोळा (10 ग्रॅम) सोन्याचा भाव 1,59,280 रुपयांवर पोहोचला आहे. 24 कॅरेटच्या 10 तोळे सोन्याच्या किमतीत 100 रुपयांची किंचित वाढ झाली आहे. तर, 22 कॅरेटचा दर 1,46,010 24 आणि 18 कॅरेटचा दर 1,19,470 रुपयांवर आहे.
प्रमुख शहरांमधील सोन्याचे प्रति 1 ग्रॅमचे ताजे दर
देशातील विविध प्रमुख शहरांमध्ये Goodreturnsच्या माहितीनुसार, 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे प्रति 1 ग्रॅमचे भाव खालीलप्रमाणे आहेत:
– दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 15943 रुपये, 22 कॅरेट सोन्याचा दर 14616 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याचा दर 11962 रुपये प्रति ग्रॅम आहे.
– मुंबई आणि पुणे येथे 24 कॅरेट सोन्याचा दर 15928 रुपये, 22 कॅरेट सोन्याचा दर 14601 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याचा दर 11947 रुपये प्रति ग्रॅम आहे.
– चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 15928 रुपये, 22 कॅरेट सोन्याचा दर 14601 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याचा दर 12381 रुपये प्रति ग्रॅम आहे.
– कोलकाता, बंगळुरू आणि हैदराबाद येथे 24 कॅरेट सोन्याचा दर 15928 रुपये, 22 कॅरेट सोन्याचा दर 14601 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याचा दर 11947 रुपये प्रति ग्रॅम आहे.
– वडोदरा आणि अहमदाबाद येथे 24 कॅरेट सोन्याचा दर 15933 रुपये, 22 कॅरेट सोन्याचा दर 14606 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याचा दर 11952 रुपये प्रति ग्रॅम आहे.
चांदीच्या दरात किंचित बदल; 1 किलोग्रॅमचा भाव 2,55,100 रुपयांवर
सोन्यापाठोपाठ चांदीच्या बाजारातही किंचित हालचाल पाहायला मिळत असून 1 किलोग्रॅम चांदीचा दर 2,55,100 रुपये नोंदवला गेला आहे. 15 टक्के इतका उच्च कर लागू असतानाही, आंतरराष्ट्रीय पातळीवरील सुरुवातीची घसरण थांबल्यानंतर सोन्या-चांदीच्या किमतींना पुन्हा एकदा आधार मिळाला आहे.
मध्य पूर्वेतील तणाव आणि जागतिक मंदीचा भारतीय बाजारावर प्रभाव
जागतिक पातळीवर विशेषतः मध्य पूर्वेतील वाढता राजकीय तणाव आणि कूटनीतिक चर्चा निष्फळ ठरल्यामुळे ऊर्जा क्षेत्रासह सर्वच प्रमुख क्षेत्रांत अस्थिरता निर्माण झाली आहे. अशा बिकट परिस्थितीत जागतिक गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे आपला मोर्चा वळवला आहे. आंतरराष्ट्रीय बेंचमार्क, राष्ट्रीय आयात शुल्क आणि परकीय चलनाचे दर या सर्व घटकांमुळे भारतीय बाजारात सोन्याच्या दरात दररोज चढ-उतार पाहायला मिळत आहेत.