Monday, February 17, 2025 12:27:02 PM

YOGESH KADAM VS MNS
'विधानसभा निवडणुकीत मनसेमुळे आमचे दहा उमेदवार पडले' कोणी केला आरोप ?

विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे (मनसे) आमचे दहा उमेदवार पडले.

विधानसभा निवडणुकीत मनसेमुळे आमचे दहा उमेदवार पडले कोणी केला आरोप

मुंबई : गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात महत्त्वाचे विधान केले आहे. “विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे (मनसे) आमचे दहा उमेदवार पडले. हिंदुत्वाचे उद्दिष्ट पक्के करायचे असल्यास आणि विधानसभेतील अशी पुनरावृत्ती टाळायची असल्यास, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आगामी महापालिकेच्या निवडणुकीत आमच्या सोबत यावे."

कदम यांनी पुढे सांगितले की, "राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा फक्त लोकसभा निवडणुकीसाठी दिला होता. मात्र, विधानसभेसंदर्भात त्यांचा निर्णय संभ्रमात होता. येणाऱ्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी आमच्यासोबत राहावे अशी आमची इच्छा आहे. जर कोणी एकनाथ शिंदे यांना दोषी ठरवत असेल, तर आम्ही ते मान्य करणार नाही. आमचे एकमेव उद्दिष्ट हिंदुत्व मजबूत करणे आहे.”

शिवसेना वाढीसाठी सर्वांना सोबत घ्यायला तयार 
राजन साळवी यांच्या शिवसेना प्रवेशावर ते म्हणाले, "शिवसेना पक्षाच्या वाढीसाठी आम्ही सर्वांना सोबत घ्यायला तयार आहोत. जर काही ज्येष्ठ नेते किंवा कार्यकर्ते पक्षात येण्याची इच्छा व्यक्त करत असतील, तर आम्ही दोन पावले मागे जाऊन त्यांचे स्वागत करू. राज्यात शिवसेना पुन्हा उभारी घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”

👉👉 हे देखील वाचा : धुळे शहरात महाराष्ट्रातील पहिली कार्डियाक लॅब रुग्णांच्या सेवेत दाखल

राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा दिल्याने निवडणुकीच्या समीकरणांवर मोठा परिणाम झाला होता. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये मनसेचा पाठिंबा महत्त्वाचा ठरणार आहे, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलेल्या विधानांमुळे येत्या निवडणुकीतील राजकीय आघाड्या कशा बनतील, याची उत्सुकता वाढली आहे.

👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.


सम्बन्धित सामग्री