Saturday, July 20, 2024 12:42:17 PM

Zika patients increased in Pune
पुण्यात झिकाचे रूग्णसंख्या वाढली

पुण्यात झिकाची रूग्णसंख्या १५ वर गेली आहे. यामध्ये ८ गर्भवती महिलांचा समावेश आहे.

पुण्यात झिकाचे रूग्णसंख्या वाढली

पुणे : पुण्यात झिकाची रूग्णसंख्या १५ वर गेली आहे. यामध्ये ८ गर्भवती महिलांचा समावेश आहे. रुग्ण आढळलेल्या परिसरात गर्भवती मातांचे सर्वेक्षण सुरू असून प्रतिबंधात्मक उपाययोजना देखील सुरू करण्यात आल्या आहेत. कोथरूड येथील भुसारी कॉलनी परिसरात राहणाऱ्या १५ वर्षीय मुलाला झिकाची लागण झाली आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.   

पावसाळा सुरू झाला म्हटलं कि साथीच्या रोगांचे प्रमाण वाढत असते. मागील काही दिवसांपासून झिका वायरसची साथ सुरू आहे. पुण्यात झिका रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून फवारणी आणि सर्वेक्षण केले जात आहे. नागरिकांनी घाबरून न जाता महापालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहरात आतापर्यंत एकूण पंधरा झिका रूग्णांची नोंद झाली आहे.  


सम्बन्धित सामग्री