Friday, May 24, 2024 10:09:13 AM

पोटाची चरबी कमी करायची आहे? या ५ खात्रीशीर पद्धतींचा करा

पोटाची चरबी कमी करायची आहे या ५ खात्रीशीर पद्धतींचा करा

मुंबई, २७ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : अनेक लोक आहेत जे त्यांच्या वाढलेल्या पोटाच्या चरबीमुळे त्रस्त आहेत. लोक तक्रार करतात की त्यांचे हात आणि पाय बारीक आहेत, परंतु त्यांचे पोट खूप सुटले आहे. त्यामुळे त्यांचे बॉडी स्ट्रक्चर खराब दिसते. याशिवाय पोट वाढल्याने अनेक आजार होतात. अशा परिस्थितीत जर तुम्हाला तुमचे बेली फॅट कमी करायचे असेल तर येथे सांगितलेल्या ५ पद्धतींचा अवलंब करा. हे केल्याने तुमच्या पोटाची चरबी कमी होईल आणि कंबरेवरील चरबीवर सुद्धा परिणाम होईल. या पद्धती तुम्हाला फिट राहण्यासही मदत करतात.

कोमट पाणी पिण्यास सुरुवात करा
कोमट पाणी प्यायल्याने पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. सकाळी सर्वात आधी कोमट पाणी प्या. तुम्ही दिवसभर कोमट पाणी पिऊ शकता. त्यामुळे जास्त कॅलरी बर्न होण्यास मदत होते. याशिवाय पचनक्रियाही चांगली राहते.

७ ते ८ तासांची झोप घ्या
वजन कमी करण्यासाठी हे सर्वात महत्वाचे आहे. जेव्हा तुम्हाला वजन किंवा पोटाची चरबी कमी करायची असेल तेव्हा शरीराला पुरेशी विश्रांती देणे आवश्यक आहे. दररोज ७ ते ८ तास झोपणे आवश्यक आहे. यामुळे शरीराला रिकव्हर होण्यास मदत होते.

चालायला सुरुवात करा
रोज सकाळी आणि संध्याकाळी चालण्याने पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. दररोज चालण्याने बॉडीला योग्य शेप देण्यास मदत होते. तुम्ही घरात सुद्धा थोडा वेळ वॉक करू शकता.

जेवण सोडू नका
लोक रोजच्या कॅलरीची संख्या कमी करण्यासाठी जेवण बंद करण्याचा किंवा सोडण्याचा निर्णय घेतात. पण हे योग्य नाही. जेव्हा तुम्ही जेवण स्किप करता तेव्हा तुम्हाला जास्त भूक लागते. ज्यामुळे कमी पौष्टिक अन्न खाण्याची इच्छा होऊ शकते. जेवण सोडल्यानंतर तुम्ही नेहमीपेक्षा जास्त खाऊ शकता.

हर्बल टी प्या
जेवण केल्यानंतर १०- १५ मिनिटांनी हर्बल टी प्या. हे अन्नाचे चांगले पचन करण्यास मदत करते आणि चयापचय देखील वेगवान करते. अशा प्रकारे तुम्ही जास्त कॅलरी बर्न करता.


सम्बन्धित सामग्री