Children Died due to Drug Resistance: हल्ली लोकांना एक-दोनच मुले असतात. त्यामुळे मुलांकडे वैयक्तिक लक्ष अधिक प्रमाणात देणे शक्य होते. तसेच, वैद्यकीय सुविधाही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. अनेक आई-वडील आणि घरातील इतर वडिलधाऱ्या लोकांना लहान मुलांना जरा काही झाले की, दवाखान्यात घेऊन जाण्याची सवय असते. तसेच, अनेकदा लहान मुलांच्या दैनंदिन आहाराकडे अनेकदा पुरेसे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे मुलांची प्रतिकार क्षमता कमी होऊन ती वारंवार आजारांना बळी पडू लागतात. शिवाय, मुले आंगणवाडी-शाळा अशा ठिकाणी इतर मुलांसोबत संपर्कात येऊ लागली की, ताकद कमजोर झालेल्या अशा मुलांना वारंवार विविध आजारांचा संसर्ग होऊ लागतो.
अनेक मूल वारंवार आजारा पडते, तेव्हा औषधोपचारांसोबत त्याच्या आहाराकडेही लक्ष देणे आवश्यक आहे, ही बाब दुर्लक्षित राहते. तसेच, बरेचदा थोडेसे बरे वाटू लागले की, औषधे स्वत:हूनच बंद केली जातात. याचा परिणाम काही वेळेस जीवघेणा ठरू शकतो. 2022 मध्ये, औषधांच्या अकार्यक्षमतेमुळे जगभरात 30 लाखांहून अधिक मुलांचा मृत्यू झाला. मुलांच्या आरोग्यावरील दोन आघाडीच्या तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासात हे समोर आले आहे. ही मुले प्रामुख्याने संसर्गाशी संबंधित आजारांनी ग्रस्त होती. परंतु, त्यांच्यावर औषधांचा परिणामच होत नव्हता.
हेही वाचा - भारतात एका दिवसात हजारो बाळांचा जन्म; चीनलाही टाकले मागे
संसर्गजन्य आजारांमध्ये दिली जाणारी औषधे आणि अँटीबायोटिक्सने काम करणे थांबवले ज्यामुळे इतक्या मुलांचा मृत्यू झाला. संसर्ग जास्त प्रमाणात वाढल्यानंतर ही अँटीबायोटिक्स दिली जातात. यातील बहुतेक मुले आफ्रिका आणि आग्नेय आशियातील होती. जेव्हा संसर्ग निर्माण करणारे सूक्ष्मजीव अशा प्रकारे बदलतात की, सामान्य प्रतिजैविके त्यांच्याविरुद्ध काम करत नाहीत, तेव्हा प्रतिजैविक प्रतिकार विकसित होतो. जगातील लोकसंख्येसमोरील सर्वात मोठ्या सार्वजनिक आरोग्य आव्हानांपैकी हे एक मानले गेले आहे.
कोविड नंतरची परिस्थिती आणि स्थिती
या आव्हानाचा मुलांवर कसा परिणाम होत आहे हे ताज्या अभ्यासातून समोर आले आहे. जागतिक आरोग्य संघटना, जागतिक बँक आणि इतर स्रोतांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, अहवालाच्या लेखकांनी असा अंदाज लावला आहे की, 2022 मध्ये प्रतिजैविक प्रतिकाराशी संबंधित संसर्गामुळे 30 लाखांहून अधिक मुले मृत्युमुखी पडली. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, गेल्या तीन वर्षांतच मुलांमध्ये प्रतिजैविक प्रतिकाराशी संबंधित संसर्ग दहा पटीने वाढला आहे. कोविड साथीच्या आजाराच्या परिणामामुळे ही परिस्थिती आणखी बिकट झाली असावी.
अँटीबायोटिकचा वाढता वापर
प्रतिजैविकांच्या अकार्यक्षमतेचे सर्वात मोठे कारण म्हणजे या औषधांचा अनावश्यक वापर. त्वचेच्या संसर्गापासून ते न्यूमोनियापर्यंत विविध प्रकारचे जीवाणू संसर्ग बरे करण्यासाठी किंवा रोखण्यासाठी अँटीबायोटिक्सचा वापर केला जातो. कधीकधी ते खबरदारी म्हणून देखील दिले जातात; जसे की, ऑपरेशनपूर्वी किंवा कर्करोगाच्या उपचारादरम्यान. परंतु, सर्दी, फ्लू किंवा कोविडसारख्या विषाणूजन्य आजारांवर अँटीबायोटिक्स काम करत नाहीत. अशा स्थितीतही काही वेळा अँटीबायोटिक्स दिली किंवा स्वतःच घेतली जातात. या अतिरेकी आणि अयोग्य वापरामुळे काही आजार निर्माण करणाऱ्या जीवाणूंमध्ये औषध-प्रतिरोधकता विकसित झाली आहे. म्हणजेच, या जीवाणूंची औषधांविरोधात लढण्याची क्षमता वाढते. तर, नवीन प्रतिजैविकांचा विकास या तुलनेत खूपच मंद आणि महागडा झाला आहे.
हेही वाचा - COVID-19 Cases in India: भारतात एका आठवड्यात 164 कोरोना रुग्णांची नोंद; केरळ आणि महाराष्ट्र आघाडीवर
याचा अर्थ असा की, आपण अशा अनेक आजारांसाठी अँटीबायोटिक्स घेतो जिथे त्यांची आवश्यकता नसते. या परिस्थितीत, हे औषध हळूहळू कुचकामी ठरते. या अहवालाचे प्रमुख लेखक डॉ. यानहोंग जेसिका हू आणि प्राध्यापक हर्ब हार्वेल यांनी सांगितले की, गंभीर संसर्गासाठी राखीव असलेल्या औषधांच्या वापरातही चिंताजनक वाढ झाली आहे. 2019 ते 2021 दरम्यान, आग्नेय आशियामध्ये वॉच अँटीबायोटिक्सचा वापर (ज्यांना प्रतिकार होण्याचा धोका जास्त असतो) 160 टक्क्यांनी आणि आफ्रिकेत 126 टक्क्यांनी वाढला. याच काळात आग्नेय आशियामध्ये राखीव अँटीबायोटिक्सचा (बहु-प्रतिरोधक संसर्गांसाठी शेवटचा उपाय असलेली औषधे) वापर 45 टक्क्यांनी आणि आफ्रिकेत 125 टक्क्यांनी वाढला.