Tuesday, November 11, 2025 10:53:46 PM

Lucky Bamboo Plant : हे लकी बांबूचे झाड तुमच्या घरात आहे का? वास्तूशास्त्रानुसार कोणत्या दिशेला ठेवावं

वास्तुशास्त्रात बांबूच्या झाडाला अत्यंत शुभ मानले जाते. बांबूचे झाड ठेवल्याने घरात सकारात्मकता आणि समृद्धी येते. या झाडाला तुम्ही अनेकदा घरात किंवा ऑफिसमध्ये नक्कीच पाहिला असाल.

lucky bamboo plant  हे लकी बांबूचे झाड तुमच्या घरात आहे का वास्तूशास्त्रानुसार कोणत्या दिशेला ठेवावं

मुंबई: वास्तुशास्त्रात बांबूच्या झाडाला अत्यंत शुभ मानले जाते. बांबूचे झाड ठेवल्याने घरात सकारात्मकता आणि समृद्धी येते. या झाडाला तुम्ही अनेकदा घरात किंवा ऑफिसमध्ये नक्कीच पाहिला असाल. वास्तूशास्त्रानुसार, जर तुम्ही या झाडाला योग्य दिशेत लावले तर त्याचे अनेक फायदे आहेत. मात्र, या झाडाला जर तुम्ही चुकीच्या दिशेत ठेवलात, तर बांबूचे झाड नकारात्मक परिणाम देऊ शकतात. 

बांबूचे झाड ठेवण्याचे फायदे

घरात बांबूचे झाड ठेवण्याचे अनेक फायदे आहेत. बांबूचे झाड घरात सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते आणि घरात सुख-शांती टिकवून ठेवते. वास्तुशास्त्रानुसार, बांबूचे झाड आर्थिक प्रगतीसाठी आणि अनावश्यक खर्च टाळण्यासाठी मदत करते. हे झाड हवेतील विषारी घटक शोषून घेते आणि हवा शुद्ध करते, ज्यामुळे घरात ताजी हवा राहते. बांबूचे रोप घरात शांततेचे वातावरण निर्माण करते.

बांबूचे झाड कोणत्या दिशेला असावे?

वास्तुशास्त्रानुसार, बांबूचे झाड पूर्व दिशेला ठेवणे सर्वात शुभ मानले जाते. असे सांगितले जाते की, जर बांबूचे झाड पूर्व दिशेला ठेवल्याने घरातील वातावरण चांगले राहते आणि आर्थिक प्रगती होते. मात्र, जर पूर्व दिशेत जागा नसेल, तर बांबूचे झाड तुम्ही दक्षिण-पूर्व किंवा उत्तर दिशेतही ठेऊ शकतात. 

हेही वाचा: Health Tips: तुम्हाला सर्दी, खोकल्याच्या समस्या जाणवत आहेत?, ही गोष्ट सकाळी गरम पाण्यात नक्की घ्या

'या' चुका टाळावे

बाथरूम किंवा स्टोअररूममध्ये बांबूचे झाड कधीही ठेवू नये. अशा ठिकाणी बांबूचे झाड ठेवल्यास शुभ फळ मिळत नाही. आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसानंतर बांबूच्या झाडाचे पाणी बदलणे गरजेचे आहे. इतकंच नाही तर, या झाडाला दक्षिण दिशेला ठेवणे टाळावे. 

'या' ठिकाणी ठेवा बांबूचे झाड

लिव्हिंग रूममध्ये बांबूचे झाड ठेवल्याने घरातील वातावरण प्रसन्न राहते, ताण कमी होतो आणि धनलाभ होतो. तसेच, अभ्यासाच्या खोलीत बांबूचे झाड ठेवल्याने मुलांची एकाग्रता वाढते आणि शिक्षणात चांगले परिणाम दिसतात.

(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)


सम्बन्धित सामग्री