भावनेच्या भरात तयार केलेले घिब्ली फोटो सुरक्षित आहेत का?

सध्या सर्वत्र घिब्ली फोटोंची चर्चा सुरू आहे. जिकडे बघाव तिकडे घिब्ली फोटो वापरण्याचा ट्रेंड सध्या सुरू आहे. लोकांनी भावनेच्या भरात स्वत:चे फोटो घिब्ली इमेजमध्ये तयार करुन घेतले.

भावनेच्या भरात तयार केलेले घिब्ली फोटो सुरक्षित आहेत का?

मुंबई : सध्या सर्वत्र घिब्ली फोटोंची चर्चा सुरू आहे. जिकडे बघाव तिकडे घिब्ली फोटो वापरण्याचा ट्रेंड सध्या सुरू आहे. लोकांनी भावनेच्या भरात स्वत:चे फोटो घिब्ली इमेजमध्ये तयार करुन घेतले. पण लोकांनी डिजिटल गोपनीयतेच्या संदर्भात ओपन एआय(OpenAI) च्या घिब्ली एआय (Ghibli AI) आर्ट जनरेटरबद्दल चिंता व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. जर तुम्ही चॅटजीपीटीमध्ये तुमचे वैयक्तिक फोटो अपलोड करून Ghibli Art तयार करत असाल तर ते किती सुरक्षित आहे? Ghibli Art खरंच सेफ आहे की नाही? असा प्रश्न देखील अनेकांनी उपस्थित केला आहे. तर घिब्ली आर्ट सुरक्षित आहे की नाही ते जाणून घेऊयात.. 

घिब्ली आर्ट हा ट्रेंड व्हायरल झाला आहे, परंतु समीक्षकांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. वापरकर्ते नकळतपणे ओपन एआयला वेगवेगळ्या चेहऱ्यांचा डेटा प्रदान करत आहेत, ज्यामुळे त्यांची गोपनीयता धोक्यात येऊ शकते.
हेही वाचा : उन्हाळ्यात हायड्रेशनसाठी ‘हा’ ज्यूस नक्की ट्राय करा 

एका युजरने समाज माध्यमावर एक पोस्ट करत सर्वांना सावधान केले आहे. वापरकर्त्यांनी एकदा त्यांचे फोटो सबमिट केले की ते त्या फोटोंच्या वापरावरील नियंत्रण गमावतात. तर OpenAI चे गोपनीयता धोरण असं सांगतं की वापरकर्ता इनपुट मॉडेल प्रशिक्षणासाठी वापरलं जाऊ शकतं. हे भविष्यासाठी धोक्याची घंटा आहे असं देखील पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे.

1. फोटो अपलोड केल्यानंतर त्यावर तुमचा अधिकार राहत नाही. म्हणून तुमचा फोटो अन्य कामांसाठी देखील वापरला जावू शकतो. त्यामुळे चॅटजीपीटीवर फोटो अपलोड करताना विचार करा. 

2. तुम्ही अपलोड केलेल्या फोटोंचा गैरवापर करून एखाद्याची ओळख चोरली जाऊ शकते. यामुळे तुमच्या वैयक्तिक गोपनियतेसाठी फोटोंची काळजी घेणे आवश्यक आहे. 

3. घिब्ली आर्टमुळे तुमची खासगी माहिती सुरक्षित राहू शकत नाही आणि तुम्ही हॅकिंगचे बळी पडू शकता. 

4. तुमच्या फोटोंचा चुकीच्या कामासाठी उपयोग होऊ शकतो. उदा. खोटे प्रोफाईल बनवणे, इत्यादी…

5. वापरकर्त्यांच्या फोटोंचा अनधिकृत वापर कायदेशीर समस्या निर्माण ठरू शकतो. हे धोके लक्षात घेऊन वापरकर्त्यांनी त्यांचे फोटो शेअर करण्यापूर्वी सावधगिरी बाळगली पाहिजे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number