महाराष्ट्रात डाळ-भात, भाजी-चपाती हे जेवणाचे अविभाज्य घटक आहेत. पण रोज तेच खाऊन अनेकांना कंटाळा येतो. अशातच उन्हाळ्यात हलकं, चविष्ट आणि पटकन बनणारं काहीतरी खायची इच्छा होते. अशावेळी आंबट-तिखट चवीचे टोमॅटो सार हे एक परफेक्ट पर्याय ठरते. कमी साहित्यामध्ये तयार होणारा हे सार भाकरी, पोळी किंवा भातासोबत अप्रतिम लागतं. रोजच्या जेवणाला एक वेगळी चव देतो. हा पदार्थ कमी साहित्यात झटपट तयार होतो. पाहुया त्याची सोपी रेसिपी.
साहित्य:
4-5 लाल टोमॅटो
1 कांदा (बारीक चिरलेला)
5-6 लसूण पाकळ्या
1 इंच आलं
2 टेबलस्पून तेल
1 टीस्पून मोहरी
1/2 टीस्पून जिरे
1/2 टीस्पून हळद
1 टीस्पून लाल तिखट
1 टीस्पून गोडा मसाला
मीठ चवीनुसार
कोथिंबीर सजावटीसाठी
कृती:
टोमॅटो मिक्सरमध्ये वाटून त्याची प्युरी तयार करा.
कढईत तेल गरम करून मोहरी आणि जिरे फोडणी द्या.
त्यात लसूण-आलं पेस्ट आणि कांदा घालून छान परतून घ्या.
कांदा सोनेरी झाला की हळद, तिखट आणि गोडा मसाला घाला.
आता टोमॅटो प्युरी घालून 5-7 मिनिटे शिजवा.
मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून रस्सा उकळी आणा.
वरून कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.