Sunday, April 20, 2025 06:04:34 AM

उष्माघात होणं टाळायचंय? मग हे सोपे घरगुती उपाय करा; उन्हाळ्यात राहील थंडावा

काही घरगुती उपायांनी कडक उन्हाचा त्रास कमी करता येतो. तसेच, उष्माघाताच्या सौम्य लक्षणांवर उपचार करता येतात. शिवाय, उष्माघात टाळताही येऊ शकतो.

उष्माघात होणं टाळायचंय मग हे सोपे घरगुती उपाय करा उन्हाळ्यात राहील थंडावा

Risk Of Heat Stroke : उन्हाळ्यात तीव्र उष्णतेमुळे उष्माघाताचा धोका वाढतो. यामध्ये शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. कडक उन्हामुळे चक्कर येणे, थकवा अशी लक्षणे जाणवू शकतात. या लक्षणांचा सौम्य प्रमाणात सर्वांनाच अनुभव येऊ शकतो. मात्र, अशी स्थिती जास्त तीव्र स्वरूपात दिसू लागणे याला उष्माघात असे म्हटले जाते. कधी कधी अशी लक्षणे जास्त काल राहिल्या व्यक्तीची स्थिती नाजूक बनते आणि जिवाला धोका निर्माण होऊ शकतो.

काही घरगुती उपायांनी कडक उन्हाचा त्रास कमी करता येतो. तसेच, उष्माघाताच्या सौम्य लक्षणांवर उपचार करता येतात. शिवाय, उष्माघात टाळताही येऊ शकतो. घरातून बाहेर पडताना डोकं झाकणं, दिवसातून पुरेशा प्रमाणात पाणी पिणे, शक्यतो उन्हाच्या वेळी घरात थांबणे किंवा इनडोअर कामे करणे, असे उपाय करता येतात.

अनेकदा घराबाहेर पडताच चक्कर येते किंवा उन्हामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याचे जाणवू लागते आणि कधीकधी तीव्र त्रास सुरू झाल्यास रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येते. अशा स्थितीत, जर तुम्ही घरातच असताना या 4 गोष्टी लक्षात ठेवल्या, तर तुम्ही पुढे होणारे सर्व त्रास सहज टाळू शकता.

हेही वाचा - उन्हाळ्यात साप चटकन हल्ला का करतात? सर्पदंश टाळण्यासाठी घ्या अशी खबरदारी

उष्माघात टाळण्यासाठी जर एखाद्या व्यक्तीने घरात काही गोष्टी केल्या, तर तो सहजपणे उष्माघात टाळू शकतो. सर्वात आधी, जेव्हा तुम्ही बाहेर जाल तेव्हा तुमचे डोके झाका. कारण, कडक ऊन थेट डोक्यावर पडल्यास उष्माघाताचा धोका खूप जास्त असतो.

आहारात करा असा बदल
1) दुपारच्या जेवणात जास्त प्रमाणात सॅलड आणि डाळींसारख्या गोष्टींचे सेवन करा. या ऋतूत पपई आणि टरबूज, कलिंगड, पेरू खूप फायदेशीर असतात. आहारात या दोन फळांचा समावेश नक्की करा. दिवसातून अर्ध्या किंवा एका लिंबाचा रस पाण्यात मिसळून प्या. अॅसिडिटीचा त्रास असल्यास लिंबू कमी प्रमाणात खावे.
2) कच्चा कांदा खा आणि दररोज 3 ते 4 लिटर पाणी प्या. दर तासाला किमान एक ग्लास पाणी प्या. जर कमी पाणी प्यायले गेले आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले आणि अशा स्थितीत तुम्ही बाहेर गेलात, तर उष्माघात होण्याची शक्यता नक्कीच असते.
3) भोपळा किंवा पालेभाज्यांसारख्या भाज्या खाण्याचा प्रयत्न करा. कारण त्यात 90% पाणी असते. जास्त धान्य खाऊ नका. शक्यतो डाळी आणि भाज्या खा किंवा सॅलडने पोट भरा. बीट, टोमॅटो, काकडी खाणे फायद्याचे आहे.
4) दुधी भोपळा आणि पालकची भाजी खा. यामध्ये तेल, तिखट, मीठ आणि मसाल्याचा वापर अगदी नगण्य असावा. तेलात फ्राय करून या भाज्या तयार करण्याऐवजी या भाज्या कुकरमध्ये वाफवून त्यात नंतर अगदी थोड्या तेलाची फोडणी घालणे चांगले ठरते.
5) याशिवाय, ताक, नाचणीचे आंबील, नाचणीचे सत्त्व तुम्ही पिऊ शकता. ताकामुळे सर्दी होईल किंवा अॅसिडिटी/पित्त होईल, असा अनेकांचा गैरसमज असतो. मात्र, असे काही होत नाही. फक्त ताक रात्री पिणे टाळावे. मात्र, उन्हाळ्यातील त्रासांवर आणि पित्तावर घरगुती तयार केलेले ताक हे रामबाण औषध आहे.
6) उन्हाळ्यात कोशिंबीर जरूर खावी. याशिवाय, तुम्ही बेलाचा रस पिऊ शकता. जर तुम्ही दररोज एक ग्लास याचे सेवन केले, तर तुम्हाला नक्कीच फायदा दिसेल.

हेही वाचा - उन्हाळी सुट्टीत ट्रिप प्लॅन करताय? 'या' टिप्स प्रवासात आरोग्य राखण्यासाठी महत्त्वाच्या

तसेच, जेव्हा तुम्ही बाहेर जाल तेव्हा चालत जाताना डोक्याला टोपी घालावी किंवा छत्री वापरावी. डोके व्यवस्थित झाकणे आवश्यक आहे. जर तुम्ही गाडी चालवत असाल, तर हेल्मेट घाला आणि बाहेरून आल्यावर लगेच थंड पाणी पिऊ नका. तुमच्या शरीराला खोलीच्या तापमानावर थोडे विश्रांती घेऊ द्या. त्यानंतरच पाणी प्या. जर तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवल्या तर, तुम्ही नक्कीच उष्णतेचे विकार आणि उष्माघात टाळू शकता.

(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

 


सम्बन्धित सामग्री