Saturday, February 14, 2026 12:50:35 AM

Anti-Aging Diet: सुरकुत्या, पिग्मेंटेशनला रामराम! त्वचेला तरुण ठेवणारे 'हे' 5 सुपरफूड्स नक्की ट्राय करा

आरशात पाहताना त्वचेची नैसर्गिक चमक हरवलेली दिसली, की बऱ्याच जणांना ताण येतो. मग ते सुरकुत्या असोत, कोरडेपणा किंवा काळपटपणा, यामुळे आत्मविश्वासावरही परिणाम होतो.

 anti-aging diet सुरकुत्या पिग्मेंटेशनला रामराम त्वचेला तरुण ठेवणारे हे 5 सुपरफूड्स नक्की ट्राय करा

 Anti-Aging Diet: आरशात पाहताना त्वचेची नैसर्गिक चमक हरवलेली दिसली, की बऱ्याच जणांना ताण येतो. मग ते सुरकुत्या असोत, कोरडेपणा किंवा काळपटपणा, यामुळे आत्मविश्वासावरही परिणाम होतो. अशा वेळी अनेकजण महागड्या क्रीम्स, सिरम्स किंवा ट्रीटमेंट्सवर अवलंबून राहतात. मात्र याचा परिणाम तात्पुरता असतो. खरं सौंदर्य शरीराला मिळणाऱ्या योग्य पोषणातूनच टिकून राहतं. याच पार्श्वभूमीवर सुप्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट लवनीत बत्रा यांनी काही नैसर्गिक पदार्थ सुचवले आहेत, जे त्वचेला आतून पोषण देऊन दीर्घकाळ तरुण ठेवू शकतात.

आहार आणि त्वचेचा संबंध

वैज्ञानिक संशोधन सांगतं की, आपली त्वचा आणि आहार यांचा थेट संबंध आहे. शरीराला योग्य अन्नद्रव्यं मिळाल्यास त्वचेच्या पेशींना आवश्यक पोषण मिळतं. यामुळे त्वचेचा टवटवीतपणा आणि आरोग्य दोन्ही सुधारतं. जर आहार योग्य नसेल, तर अगदी महागडे स्किनकेअर प्रॉडक्ट्सही फारसा फरक करू शकत नाहीत.

हेही वाचा: Beauty Tips: सणासुदीला सुंदर दिसायचं आहे, मग हा फेसपॅक नक्की ट्राय करा

तरुण त्वचेसाठी 5 खास पदार्थ

1. डाळींब
डाळींबामध्ये मुबलक प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन C आणि इतर पोषक तत्त्वं असतात. हे घटक त्वचेतील कोलेजन वाढवतात, ज्यामुळे त्वचा घट्ट राहते. तसेच सूर्यप्रकाशामुळे होणाऱ्या हानिकारक परिणामांपासून बचाव करतात. नियमित डाळींब खाल्ल्याने पिग्मेंटेशन कमी होऊन त्वचेचा टोन एकसमान होतो.

2. नारळपाणी आणि मलई
नारळपाणी हे शरीराचं नैसर्गिक हायड्रेशन बूस्टर आहे. त्यातील इलेक्ट्रोलाइट्स त्वचेला आर्द्रता देतात. तर नारळाच्या मलईतील हेल्दी फॅट्स त्वचेला आतून लवचिकता देतात. उन्हाळ्यात विशेषतः याचा फायदा अधिक जाणवतो.

3. कोरफड
कोरफडला नैसर्गिक मॉइश्चरायझर मानलं जातं. त्यातील घटक त्वचेतील आर्द्रता टिकवतात आणि कोरडेपणा कमी करतात. कोरफडीचं सेवन केल्यास किंवा जेल थेट त्वचेवर लावल्यास त्वचेला शांतता, तजेला आणि मृदुता मिळते.

4. पिस्ता
पिस्ता हा एक उत्तम स्नॅक असण्याबरोबरच सौंदर्यासाठीही फायदेशीर आहे. त्यात असणारं व्हिटॅमिन E त्वचेवर येणाऱ्या फ्री रॅडिकल्सच्या हानिकारक परिणामांपासून संरक्षण करतं. यामुळे सुरकुत्या उशिरा येतात आणि त्वचा तरुण दिसते.

हेही वाचा:Glowing Skin Remedy: त्वचेला मऊ आणि तेजस्वी बनवायचंय? रोज रिकाम्या पोटी प्या 'हे' खास पाणी

5. केशर
प्राचीन काळापासून सौंदर्य वृद्धिंगत करण्यासाठी केशराचा वापर केला जातो. त्यातील अँटिऑक्सिडंट्स त्वचेचं नुकसान कमी करतात आणि उजळपणा वाढवतात. दुधात किंवा इतर पेयांमध्ये थोडं केशर घालून सेवन केल्यास त्याचा थेट फायदा त्वचेवर दिसतो.

महागड्या स्किनकेअर प्रॉडक्ट्सवर पैसे खर्च करण्याऐवजी, रोजच्या आहारात हे पाच पदार्थ समाविष्ट करणं अधिक फायदेशीर ठरू शकतं. कारण खरी चमक ही शरीराच्या आतून मिळते, आणि ती टिकवून ठेवण्याचं काम हे सुपरफूड्स करतात. निरोगी त्वचेसाठी योग्य झोप, पुरेसं पाणी आणि संतुलित आहार हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे.

(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
 


सम्बन्धित सामग्री






ताज्या बातम्या




ताज्या बातम्या