Copper Water Side Effects: तांब्याच्या बाटलीतील पाणी आरोग्यासाठी उपयुक्त, पण चुकीच्या पद्धतीने पिणे धोकादायक; तज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या

तांब्याच्या बाटलीतील पाणी पिण्याबद्दल अनेक वर्षांपासून चर्चा चालत आहे.

Copper Water Side Effects: तांब्याच्या बाटलीतील पाणी आरोग्यासाठी उपयुक्त, पण चुकीच्या पद्धतीने पिणे धोकादायक; तज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या

Copper Water Side Effects: तांब्याच्या बाटलीतील पाणी पिण्याबद्दल अनेक वर्षांपासून चर्चा चालत आहे. अनेक लोक मानतात की प्लॅस्टिकच्या बाटल्या आरोग्यासाठी हानिकारक असतात, त्यामुळे स्टील किंवा कॉपरच्या बाटल्या वापरणं अधिक सुरक्षित ठरतं. तांब्याच्या भांड्यातील पाण्यात नैसर्गिकरित्या काही विशेष गुणधर्म असतात, जे शरीराच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.

तांब्याचे पाणी पचनक्रिया सुधारण्यास मदत करतं, आतड्यांचे आरोग्य राखतं आणि शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करतं. त्याचप्रमाणे, तांब्याच्या पाण्यात अँटिऑक्सिडंट्स असतात जे पेशींना संरक्षण देतात आणि वृद्धत्वाच्या प्रक्रियेला मंदावतात. थायरॉईड आणि हार्मोनल संतुलन राखण्यासाठीही हे उपयुक्त असतं. तज्ज्ञ डॉ. श्वेता शहा पांचाल यांचे म्हणणे आहे की, कॉपर म्हणजे एक महत्वाचा मायक्रोन्यूट्रिएंट आहे, जो रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो, पचन सुधारतो आणि मेटाबॉलिझमला चालना देतो.

हेही वाचा: Hair Care Tips : केस बांधून झोपावे की मोकळे सोडून? या टिप्स वापरल्यात तर केसांचं तुटणं-गळणं होईल कमी

तथापि, दिवसभर तांब्याच्या बाटलीतील पाणी सतत पिण्यामुळे शरीरात कॉपरचे प्रमाण जास्त जाऊ शकते. यामुळे पोटदुखी, मळमळ, उलटी, यकृतावर ताण अशा लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे तांब्याच्या बाटलीतील पाणी एक सप्लिमेंटसारखे प्या, दिवसभर पिऊ नका. दररोज 1-2 ग्लास पाणी पुरेसं ठरतं.

तांब्याची बाटली वापरत असाल तर ती दररोज नीट स्वच्छ करा. अनेक वेळा बाटलीचा तोंड लहान असतो आणि साफ करणे कठीण जाते. त्यामुळे खरेदी करताना रुंद तोंड असलेली बाटली निवडा, ज्यामध्ये ब्रशने पूर्ण स्वच्छता करता येईल.

आजकाल बाजारात काही बाटल्या आहेत ज्या तांब्याची भेसळ करून बनवल्या जातात, किंवा आतून दुसऱ्या धातूने बनवल्या जातात. अशा बाटल्यांमुळे आरोग्यास हानी पोहोचू शकते. म्हणून तांब्याची बाटली विकत घेताना नेहमी विश्वसनीय ब्रँडची निवड करा.

हेही वाचा: Cow Milk VS Buffalo Milk: रात्री झोपण्यापूर्वी गाईचे दूध प्यावे की म्हशीचे? जाणून घ्या

तांब्याच्या भांड्यात पाणी चार ते पाच तास ठेवल्यानंतर प्यायला हवे. जर तुम्ही सकाळी फक्त एक ग्लास पाणी पित असाल, तर जास्तीत जास्त 12 तास ठेवलेले पाणी पिणे सुरक्षित आहे. सतत एकाच पाण्याचा वापर केल्यास शरीरातील कॉपरचे प्रमाण वाढते आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

शेवटी, तांब्याच्या बाटलीतील पाणी आरोग्यासाठी फायदेशीर आणि हानिकारक दोन्ही ठरू शकतं, फक्त योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने पिणे आवश्यक आहे.

(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number