मुंबई: वातावरणातील बदलामुळे आजकाल अनेकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे, अनेकांना त्यांच्या दैनंदिन कामांत अतिरिक्त उर्जेची आवश्यकता असते. त्यामुळे, निरोगी आणि एनर्जेटिक राहण्यासाठी अनेकजण विविध फळांचे सेवन करतात. यासह, इम्युनिटी लेव्हल वाढवण्यासाठी आणि हायड्रेटेड राहण्यासाठी अनेकजण डिटॉक्स वॉटरचे सेवन करतात. मिळालेल्या माहितीनुसार, डिटॉक्स वॉटरचे सेवन केल्याने पी एच लेव्हल, इम्युनिटी संतुलित ठेवण्यास मदत करते. विशेष म्हणजे, डिटॉक्स वॉटर बनवायला फक्त 5 मिनिट लागतात. चला तर जाणून घेऊया.
साहित्य:
3 लिटर पाणी
1 काकडी
1 वाटी पुदिना
1-2 लिंबू
1-2 आले
कृती:
सर्वप्रथम, काकडी, पुदिना, लिंबू आणि आले स्वच्छ धूवून घ्या. त्यानंतर,एका ग्लास किंवा जारमध्ये पाणी घ्या. त्यानंतर, ग्लासमध्ये काकडी, लिंबू, पुदिन्याची पाने आणि काकडीचे काप पाण्यात मिक्स करा. हे मिश्रण 2 ते 3 तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवा, जेणेकरुन सर्व घटकांचे फ्लेवर पाण्यात उतरतील. तब्बल 2 ते 3 तासांनंतर फ्रीजमधून हे मिश्रण बाहेर काढा. आता डिटॉक्स वॉटर तयार आहे.
हेही वाचा: How to Identify Pure Honey: मध खरा आहे की बनावट?, जाणून घ्या शुद्धता कशी ओळखायची?
डिटॉक्स वॉटर पिण्याची योग्य वेळ
सकाळी रिकाम्या पोटी डिटॉक्स वॉटर पिणे सर्वोत्तम मानले जाते. दिवसाच्या सुरुवातीला डिटॉक्स वॉटर पिल्याने शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडते. यासह, पचनशक्ती वाढवण्यास डिटॉक्स वॉटर मदत करते. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, डिटॉक्स वॉटर पिल्यामुळे शरीराला आवश्यक ते हायड्रेशन मिळते. जर तुम्हाला दिवसभर हायड्रेटेड राहायचे असेल, तर तुम्ही डिटॉक्स वॉटर पिण्यास सुरुवात करावी.
महत्त्वाची सूचना: डिटॉक्स वॉटर हे पूर्णपणे डिटॉक्सिफिकेशनचा पर्याय नाही, त्यामुळे संतुलित आहार घेणे महत्त्वाचे आहे. रात्री डिटॉक्स वॉटर पिल्याने ऍसिडिटी होऊ शकते. म्हणून रात्री डिटॉक्स वॉटर पिणे टाळा.
(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)