शरीरात रक्ताची कमतरता (हिमोग्लोबिन कमी) असल्यास सतत थकवा येणे, अशक्तपणा जाणवणे आणि चेहऱ्यावरील नैसर्गिक चमक कमी होणे ही सामान्य लक्षणे आहेत. असंतुलिक व चुकीच्या आहारामुळे ही समस्या अधिक वाढू शकते. मात्र, योग्य आणि पौष्टिक आहार घेतल्यास हिमोग्लोबिन नैसर्गिकरित्या वाढवता येते. हिरव्या भाज्या, फळं, सुका मेवा या पदार्थांचा आहारात समावेश करून रक्ताची कमतरता भरून काढू शकता. यामुळे शरीरात रक्ताची कमतरता भासत नाही. काही खास पदार्थ असे आहेत जे रक्तनिर्मितीला मदत करतात आणि शरीराला ऊर्जा देतात. हे पदार्थ नियमित आहारात समाविष्ट केल्यास तुमचा थकवा दूर होईल आणि चेहऱ्यावर पुन्हा तेज दिसू लागेल.
बीट
बीट खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढते. बीटमध्ये लोह फॉलिक ऍसिड आणि पोटॅशियम भरपूर असते, जे शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यास मदत करते. बीटच्या तुलनेत त्याच्या पानांमध्ये अधिक लोह असते.
डाळिंब
डाळिंब हे रक्तवाढीसाठी उपयुक्त फळ मानले जाते, कारण त्यामध्ये लोह आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. हे हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते आणि शरीरातील अशक्तपणा कमी करते. नियमित सेवन केल्यास ऊर्जा वाढून चेहऱ्यावर नैसर्गिक तेजही येते.
गूळ
गूळ हा लोहाचा चांगला स्रोत असल्यामुळे तो रक्तवाढीस मदत करतो. नियमित गूळ खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढण्यास आणि अशक्तपणा कमी होण्यास सहाय्य होते. तसेच गूळ शरीराला ऊर्जा देऊन थकवा दूर करण्यातही उपयुक्त ठरतो.
दूध आणि सुका मेवा
दूध आणि सुका मेवा हे पोषणमूल्यांनी समृद्ध असल्यामुळे शरीराला आवश्यक ऊर्जा देतात. यामधील प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे शरीर मजबूत ठेवण्यास मदत करतात. नियमित सेवन केल्यास अशक्तपणा कमी होऊन ताकद आणि स्टॅमिना वाढतो.
सफरचंद
सफरचंद दररोज एकतरी सफरचंद खायला हवं. अॅनिमियासारखे (अॅनिमिया म्हणजे रक्तातील लाल पेशी कमी होणे) आजार दूर करण्यासाठी सफरचंद फायदेशीर ठरते. याच्या सेवनाने शरीरातील हिमोग्लोबीन वाढवता येते.
मनुके
मनुके हे व्हिटामीन B कॉम्प्लेक्स आणि लोहाने समृद्ध असल्यामुळे रक्तवाढीस मदत करतात. यांच्या नियमित सेवनाने हिमोग्लोबिन वाढण्यास आणि शरीरातील अशक्तपणा कमी होण्यास सहाय्य होते. तसेच मनुके शरीराला ऊर्जा देऊन थकवा दूर करण्यातही उपयुक्त ठरतात.
अक्रोड
अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि व्हिटामिन-बी मुबलक प्रमाणात असतात. हे पोषक घटक शरीराला आवश्यक पोषण देऊन रक्तनिर्मितीस मदत करतात. नियमित अक्रोड खाल्ल्याने हिमोग्लोबिनची कमतरता भरून काढण्यास आणि ऊर्जा वाढवण्यास मदत होते.
(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)