हिवाळा म्हणजे प्रचंड थंडी, जे शरीराला उष्णता टिकवून ठेवण्यासाठी अधिक ऊर्जा वापरायला भाग पाडतो. याच कारणामुळे हिवाळ्यात शरीराला अधिक भूक लागते. थंड हवामानात शरीराचं तापमान स्थिर ठेवण्यासाठी चयापचय प्रक्रिया जलद गतीने सुरू होते. यासाठी अधिक कॅलरीजची गरज भासते, ज्यामुळे सतत काहीतरी खाण्याची इच्छा निर्माण होते. याशिवाय, थंडीत शरीराला जास्त काम करण्यासाठी आणि उष्णतेसाठी ऊर्जा हवी असते. त्यामुळे हिवाळ्यात आपल्याला जास्त प्रमाणात भूक लागते. हिवाळ्यात भूक भागवण्यासाठी जंक फूड किंवा तेलकट पदार्थ खाण्याऐवजी पौष्टिक आणि उष्णता देणारे पदार्थ खाणे गरजेचे आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
भूक लागल्यावर पौष्टिक काय खावे?
ड्रायफ्रूट्स आणि नट्स: बदाम, काजू, अक्रोड, मनुका यांसारखे सुके मेवे उष्णता देतात आणि शरीराला आवश्यक फॅट्स पुरवतात.
गूळ आणि शेंगदाणे: गूळ आयर्नचा उत्तम स्रोत आहे आणि उष्णता टिकवून ठेवतो. शेंगदाणे प्रथिने आणि फायबरसाठी फायदेशीर आहेत.
तूप आणि घरी बनवलेले लाडू: तूपयुक्त पदार्थांमुळे शरीराला उष्णता मिळते. रागी, गहू, बेसन यापासून बनवलेले लाडू हिवाळ्यात उपयुक्त ठरतात.
हिरव्या पालेभाज्या: मेथी, पालक, शेपू यांसारख्या पालेभाज्या शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे आणि मिनरल्स पुरवतात.
हळद दूध: रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीर उष्ण राहते.
सूप : भाज्या किंवा चिकनचे सूप शरीराला उष्णता आणि ऊर्जा देते.
हिवाळी फळे: संत्री, मोसंबी, आवळा यांसारख्या फळांमध्ये भरपूर व्हिटॅमिन C असते, जे शरीराला रोगांपासून वाचवते.
तिळाचे पदार्थ: तिळाचे लाडू किंवा चटणी हिवाळ्यात खूप फायदेशीर ठरतात, कारण तीळ उष्णता निर्माण करतो.
हिवाळ्यात पोषणमूल्य असलेले पदार्थ खाल्ल्यास शरीर निरोगी आणि ऊर्जावान राहते. त्यामुळे सतत भूक लागल्यासारखे वाटत असल्यास आरोग्यदायी आणि घरगुती पदार्थांचा समावेश करा. हे तुम्हाला उष्णता आणि पोषण दोन्ही देईल.