Thursday, November 13, 2025 09:04:28 AM

Benefits Of Groundnut : शेंगदाणे आरोग्यासाठी सुपरफूड; अंडी-काजूंपेक्षा अधिक प्रोटीन, जाणून घ्या रोज किती शेंगदाणे खावेत

शेंगदाणे केवळ चवीलाच स्वादिष्ट नसतात, तर ते आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहेत. शेंगदाण्याला 'गरिबांचा मेवा' असे म्हटले जाते. शाकाहारी लोकांसाठी शेंगदाणे हे सुपरफूड आहे.

benefits of groundnut  शेंगदाणे आरोग्यासाठी सुपरफूड अंडी-काजूंपेक्षा अधिक प्रोटीन जाणून घ्या रोज किती शेंगदाणे खावेत

Health Benefits of Groundnut : थंडीच्या दिवसांत शेंगदाण्याचे (Groundnut) नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटते. शेंगदाणे केवळ चवीलाच स्वादिष्ट नसतात, तर ते आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहेत. शेंगदाण्याला 'गरिबांचा मेवा' असे म्हटले जाते. कारण यामध्ये महागड्या काजू आणि बदाम यांसारख्या ड्राय फ्रूट्समध्ये आढळणारे सर्व पोषक घटक उपलब्ध असतात. तसेच, ते अंडी आणि काजू यापेक्षाही अधिक प्रोटीन देतात. एकंदरीत, शेंगदाणा हे एक स्वस्त, चवदार आणि पौष्टिक सुपरफूड आहे.

प्रोटीनचा पॉवरहाऊस आणि पोषण मूल्य
शेंगदाणा हे प्रोटीनचा उत्कृष्ट स्रोत आहे. 100 ग्रॅम शेंगदाण्यात सुमारे 25-26 ग्रॅम प्रोटीन असते. तर, 100 ग्रॅम अंड्यांमध्ये 13 ग्रॅम आणि 100 ग्रॅम काजूमध्ये 18 ग्रॅम प्रोटीन असते. त्यामुळे शेंगदाण्यात अधिक प्रोटीन असते, ही बाब स्पष्ट होते. याच कारणामुळे शाकाहारी लोकांसाठी शेंगदाणा हा उत्कृष्ट प्रोटीन स्रोत मानला जातो. हे स्नायू (Muscles) तयार करण्यास, पेशींची दुरुस्ती (Tissue Repair) करण्यास आणि ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करते. दररोज 25 ते 30 ग्रॅम शेंगदाणे म्हणजेच मूठभर शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी योग्य आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक शरीरासाठी हानिकारक ठरू शकतो, हे आपल्याला माहीतच आहे. 

हृदय, वजन आणि मेंदूसाठी फायदे
शेंगदाण्यामध्ये 'मोनोअनसॅचुरेटेड' आणि 'पॉलीअनसॅचुरेटेड' फॅटी ॲसिडस् आढळतात. हे घटक शरीरातील खराब कोलेस्टेरॉल (LDL) कमी करून चांगले कोलेस्टेरॉल (HDL) वाढवतात. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि हार्ट ब्लॉकेजचा धोका कमी होतो. तसेच, त्यात असलेले अँटिऑक्सिडंट 'रेसवेराट्रॉल' हृदयाला मजबूत बनवते.
काही लोकांना वाटते की, शेंगदाणे खाल्ल्याने वजन वाढते, पण हे खरे नाही. शेंगदाण्यातील फायबर आणि प्रोटीन पोट दीर्घकाळ भरलेले ठेवतात, ज्यामुळे जास्त खाणे टळते. अशा प्रकारे शेंगदाणे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतात आणि चयापचय क्रिया (Metabolism) सक्रिय ठेवतात.

हेही वाचा - Health Tips: मधुमेह असल्यास डाळिंबाचा रस प्यावा का?, जाणून घ्या

शेंगदाण्यातील नियासिन आणि व्हिटॅमिन बी3 मेंदूची कार्यक्षमता वाढवतात. हे नर्वस सिस्टमला शांत ठेवतात आणि अल्झायमरसारख्या आजारांपासून बचाव करतात. मुलांची बुद्धी तल्लख करण्यासाठी शेंगदाणे त्यांच्या आहारात नक्कीच समाविष्ट केले पाहिजेत. यासाठी कच्चे किंवा भाजलेले शेंगदाणे, शेंगदाण्याची चटणी यांचा आहारात समावेश करता येईल. याशिवाय, वेगवेगळ्या भाज्या बनवताना तुम्ही त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट वापरू शकता.

त्वचा, केस आणि शुगर नियंत्रण:
शेंगदाण्यामध्ये असलेले व्हिटॅमिन ई आणि झिंक त्वचेला चमकदार बनवतात आणि केसांना मजबूत करतात. हे घटक एजिंग (Aging) प्रक्रिया कमी करतात आणि त्वचेला आतून हायड्रेट ठेवतात. शेंगदाण्याचे तेल उत्तम मॉइश्चरायझर म्हणून केस आणि त्वचेसाठी वापरले जाऊ शकते.

मधुमेहाच्या रुग्णांसाठीही शेंगदाणे एक आरोग्यदायी स्नॅक आहे. शेंगदाण्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो, ज्यामुळे ते रक्तातील साखर (Blood Sugar) वेगाने वाढू देत नाही. मात्र, मधुमेही लोकांनीही शेंगदाणे मर्यादेतच खाणे योग्य आहे.

हेही वाचा - Fatty Liver: लिव्हरसाठी सर्वात मोठा धोका! नॉनवेज आणि बर्गरपेक्षा 'हा' पदार्थ घातक 

(Disclaimer :  ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)


सम्बन्धित सामग्री