Winter Skincare: हिवाळा सुरु झाला की त्वचेच्या तक्रारी आपोआप वाढतात. विशेषतः सकाळी उठल्यावर किंवा रात्री बेडवर झोपण्यापूर्वी आरशात चेहरा पाहिला की लगेच जाणवतं. त्वचा पूर्वीसारखी तजेलदार दिसत नाही; ओठ कोरडे, नाकाजवळ सोलणे, गालांवर खडबडीतपणा या सगळ्या समस्या थंडीने हवेतला ओलावा खेचून घेतल्यामुळे होतात. स्किनला हायड्रेशन फक्त क्रीम सिरमने नाही तर आहारातूनही मिळायला हवं. आणि या हिवाळ्यात त्यासाठीचा सगळ्यात सोपा उपाय अगदी आपल्या हाताशी आहे… सर्वांच्या आवडीचं आणि बजेटमध्ये मिळणारं फळ 'पेरू.'
पेरू हा एवढा साधा दिसणारा फळ पण त्यातील ‘पोषण’ उच्च दर्जाचं असतं. त्वचेच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्वाचं घटक म्हणजे व्हिटॅमिन C. आणि ही आश्चर्याची गोष्ट आहे की पेरूमध्ये व्हिटॅमिन C चे प्रमाण संत्रे – लिंबू यांच्या तुलनेत देखील जास्त आहे. व्हिटॅमिन C हे कोलेजनला सपोर्ट करतं आणि कोलेजन म्हणजे त्वचेचा ‘नैसर्गिक बांधकाम साहित्य’. त्यामुळे पेरू खाल्ल्याने त्वचा फक्त वरून टवटवीत दिसते असा नाही, तर आतून स्किनची गुणवत्ता सुधारते.
इतकंच नाही, पेरूमध्ये व्हिटॅमिन A आणि लाइकोपीनही असतात. हे घटक त्वचेतील रिंकल्स, फ्री रॅडिकल डॅमेज, अनइव्हन स्किनटोन यांच्यावर काम करतात. त्यामुळे थंडीत दिसणारी ‘डेड’ आणि ‘लाइफलेस’ स्किन पुन्हा हळूहळू नॅचरल ग्लो परत मिळवते. तज्ज्ञ सांगतात की रोज पेरू खाल्ला तर फक्त बाहेरून मॉइश्चरायझर लावण्यावर अवलंबून राहण्याची गरज कमी होते.
हिवाळा म्हणजे कोमट पाणी वापरण्याचा सीजन. पण जास्त गरम पाण्याने चेहरा धुतल्याने त्वचेतील नॅचरल ऑइल निघून जातं. त्याला सैट बॅलन्समध्ये ठेवण्यासाठी पेरूप्रमाणे आतून पोषक देणारे फळ महत्वाचं. पेरूमध्ये फायबर असतं, जे डायजेशन योग्य ठेवतं. त्वचेला ‘क्लीन आणि ग्लोईंग’ दिसण्यासाठी आतली डीटॉक्स प्रोसेस चांगली असणं तितकंच महत्त्वाचं.
पोषणतज्ञ सांगतात हिवाळ्यात दररोज दोन जेवणांपैकी एक 1 पेरू खाणं त्वचेसाठी फायदेशीर. सकाळच्या मिनरल्स व्हिटॅमिन बूस्टसाठीही पेरू उत्तम पर्याय आहे. हे कोल्ड प्रूफिंग फळ मानलं जातं कारण यात इम्युनिटी सपोर्ट करणारं व्हिटॅमिन C आढळतं. सर्दी- खोकला टाळण्यासाठीही मदत होते.
रात्री झोपण्यापूर्वी पेरूचं स्मूदी घेणारे लोकही आहेत. फक्त स्मूदीमध्ये साखर न घालणं हे महत्त्वाचं. पेरू सलाड, कट करून मधासोबत किंवा साधाच घेऊ शकता.
(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)