Monday, November 17, 2025 12:40:14 AM

Breathing Problems : श्वास घ्यायला त्रास होतोय? हे आयुर्वेदिक डिटॉक्स ड्रिंक्स लगेच प्या! फुफ्फुसे 'स्वच्छ' होऊन फ्रेश वाटेल

तुम्हालाही दिवाळीनंतर श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर तुमच्या फुफ्फुसांना (Lungs) 'स्वच्छ' (Detox) करणे गरजेचे आहे. जाणून घ्या, हे कसे करायचे..

breathing problems  श्वास घ्यायला त्रास होतोय हे आयुर्वेदिक डिटॉक्स ड्रिंक्स लगेच प्या फुफ्फुसे स्वच्छ होऊन फ्रेश वाटेल

Breathing Problems After Diwali : दिवाळीनंतर फटाक्यांचा धूर आणि तेलकट पदार्थांमुळे श्वास लागणे, घसा बसणे, वारंवार ठसका येणे, खोकल्याची उबळ येणे या जवळपास सर्वांना जाणवणाऱ्या सामान्य समस्या आहेत. दिवाळीव्यतिरिक्त नेहमी सुद्धा शहरांमध्ये आणि गजबजलेल्या ठिकाणी खराब वातावरणामुळे आणि प्रदूषणामुळे आसपासच्या लोकांना या समस्या जाणवतात. अनेकदा दिवाळीनंतर तर परिस्थिती अधिकच बिकट होते. असा काळ लहान मुले, वयोवृद्ध आणि श्वसनविकारांनी त्रस्त लोकांसाठी खूप कठीण असतो; अशा वेळी त्यांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

जर तुम्हालाही दिवाळीनंतर श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर तुमच्या फुफ्फुसांना (Lungs) 'स्वच्छ' (Detox) करणे गरजेचे आहे. म्हणूनच, आज आम्ही तुम्हाला 5 आयुर्वेदिक डिटॉक्स ड्रिंक्सबद्दल सांगणार आहोत, जे तुमच्या फुफ्फुसांना नैसर्गिकरित्या स्वच्छ आणि मजबूत बनवतील.

नैसर्गिक डिटॉक्स ड्रिंक्स आणि त्यांचे फायदे
या डिटॉक्स ड्रिंक्सची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती सहज उपलब्ध असलेल्या साहित्यापासून बनवता येतात आणि ते बनवण्यासाठी जास्त मेहनत लागत नाही. हे नैसर्गिक पेय केवळ फुफ्फुसांची सफाई करून त्यांना बळकट करत नाहीत, तर शरीराला डिटॉक्स करतात, रोगप्रतिकारशक्ती (Immunity) वाढवतात आणि ऊर्जा देण्यासही मदत करतात.

फुफ्फुसांना शुद्ध करणारे 5 प्रभावी पेये
1. आले-लिंबू चहा (Ginger-Lemon Tea): आले आणि लिंबापासून बनलेला हा चहा शरीरातील विषारी घटक (Toxins) बाहेर काढण्यास मदत करतो. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी आणि आल्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स असल्याने ते फुफ्फुसांना बळकट करतात आणि संसर्गाशी लढण्यास मदत करतात. सकाळी रिकाम्या पोटी हे पेय पिणे सर्वात फायदेशीर मानले जाते.

2. गाजर-बीटचा ज्यूस (Carrot-Beetroot Juice): गाजर आणि बीट हे हृदयाच्या आणि त्वचेच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहेत. त्यांचा ज्यूस प्यायल्याने रक्तप्रवाह सुधारतो आणि थकवा कमी होतो. या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असतात, जे फुफ्फुसांसह शरीरातील इतर अवयवांसाठीही उपयुक्त ठरतात.

हेही वाचा - Beauty Tips: ग्लो नाही तर नुकसान, कॉफी लावल्याने होऊ शकतात 'या' समस्या

3. लिंबू-मध पाणी (Lemon-Honey Water): लिंबू आणि मध मिसळलेले पाणी केवळ वजन कमी करण्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण शरीराची प्रभावीपणे सफाई करण्यासाठी उपयुक्त आहे. हे डिटॉक्स ड्रिंक व्हिटॅमिन सी च्या माध्यमातून रोगप्रतिकारशक्ती वाढवते. तसेच, दिवाळीच्या धावपळीत निस्तेज झालेल्या तुमच्या त्वचेलाही हे पेय चमकदार बनवते.

4. हळदीचे दूध (Turmeric Milk): जखम झाल्यावर तुम्ही अनेकदा लोकांना हळदीचे दूध पिताना पाहिले असेल, पण हे पेय फुफ्फुसांना डिटॉक्स करण्यासाठीही उपयुक्त आहे. हळदीतील करक्युमिन (Curcumin) हा घटक सूज कमी करतो आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतो. रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्यायल्यास फुफ्फुसांचे संरक्षण होते आणि गळा तसेच फुफ्फुसांमधील जळजळ कमी होते.

5. ज्येष्ठमध चहा (Licorice Tea): ज्येष्ठमधाचा चहा घसा खवखवणे कमी करतो आणि श्वसनसंस्थेला आराम देतो. या चहामध्ये अँटिऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-मायक्रोबियल गुण असल्यामुळे तो खोकला आणि श्वास घेण्याच्या त्रासातून आराम देतो. तसेच, पचनक्रिया सुधारण्यासाठीही हा चहा चांगलो मानलो जातो. याशिवाय, ज्येष्ठमधाचा तुकडा चघळणेही घशाच्या समस्यांमध्ये लाभदायक असते.

तुम्ही जर रोज या 5 डिटॉक्स ड्रिंक्सचे सेवन केले, तर केवळ तुमच्या फुफ्फुसांचेच नाही, तर एकूण आरोग्यही चांगले राहील. मात्र, या पेयांसोबतच धूम्रपान, धूळ आणि प्रदूषण यापासून दूर राहणे आवश्यक आहे, कारण फुफ्फुसांचे आरोग्य केवळ या पेयांमुळेच नव्हे, तर संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैलीने मजबूत होते.

हेही वाचा - Hair Tips: केस गळती आणि कोंडा दूर करण्यासाठी 'या' गोष्टी नक्की लावा

(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)


सम्बन्धित सामग्री